Ghum Hai Kisi Key Pyaar Meiin : 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisi key Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्टची जवळीक वाढली. त्यांच्यात छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नदेखील केलं. आता या मालिकेतील विहान वर्मा आणि स्नेहा भावसर रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. 


विहान वी वर्मा आणि स्नेहा भावसर एकमेकांच्या प्रेमात?


मीडिया रिपोर्टनुसार, विहान वी वर्मा आणि स्नेहा भावसर रिलेशनमध्ये असल्याची अफवा आहे. 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisi Key Pyaar Meiin) या मालिकेत विहान आणि स्नेहा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ते या मालिकेत मोहित चव्हाण आणि करिश्मा चव्हाणच्या भूमिकेत दिसत आहेत. पण विहान आणि स्नेहाचं नातं मैत्रीच्या पुढे गेलं आहे, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.






'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर विहान आणि स्नेहा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. सेटवरील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर विहान आणि स्नेहा एकत्र येतात. एकमेकांसोबतच जेवण करतात. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला त्यांना आवडतं. 


विहान वी वर्मा आणि स्नेहा भावसरचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. तर या मालिकेच्या सेटवर नील-ऐश्वर्यानंतर अभिनेत्री आयशा सिंह आणि निर्माते राजेश राम सिंहचा मुलगा ईशानसोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. 


'गुम है किसी के प्यार में' ही मालिका आता 20 वर्षांचा लीप घेणार असल्याने आता या मालिकेत नवीन पात्रांची एन्ट्री होणार आहे. पण नव्या कथानकरात विराटच्या कुटुंबाचा समावेश आहे. त्यामुळे किशोरी शहाणे, शैलेश दातार, भारती पाटील, शीतल मौलिक, तन्वी ठक्कर आणि विहान वर्मा या कलाकारांचा यात समावेश आहे. 


संबंधित बातम्या


Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : नील भट्टसह आयशा आणि हर्षद सोडणार 'गुम है किसी के प्यार मैं' मालिका; समोर आलं मोठं कारण