Friendship Day 2023: मैत्री म्हणजे विश्वास आणि आपुलकीचं नातं (Friendship Day 2023). मैत्री या नात्यावर अनेक कवींनी कविता केल्या आहेत. तसेच मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट देखील तुम्ही पाहिले असतील. मैत्री या नात्यावर आधारित असलेल्या छोट्या पडद्यावरील काही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. जाणून घेऊयात या मालिकांबद्दल...


दिल दोस्ती दुनियादारी (Dil Dosti Duniyadari)



दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचे कथानक अशा सहा व्यक्तींवर आधारित होते  जे एकत्र राहू लागतात. या सहा जणांची मैत्री होते. ही मालिका लोकप्रिय झाली  होती. या मालिकेचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमध्ये अभिनेता अमेय वाघ, सुव्रत जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सखी गोखले, स्वानंद टिकेकर आणि पूजा ठोंबरे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  दिल दोस्ती दोबारा  असं या मालिकेच्या दुसऱ्या सीझनचं नाव होतं. काही दिवसांपूर्वी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या कलाकारांनी चला हवा येऊ द्या मालिकेमध्ये हजेरी लावली होती.






फुलपाखरू (Phulpakharu)



फुलपाखरू हा शो फक्त मानस आणि वैदेहीच्या प्रेमकथेबद्दल नाही तर त्यांच्या कॉलेज गँगसोबतच्या मैत्रीवर देखील आधारित होता. कॉलेजचे लेक्चर्स बंक करणे तसेच  कॉलेज पिकनिक हे सर्व या मालिकेत दाखवण्यात आले होते. हृता दुर्गुळे,यशोमान आपटे, शलाका पवार या कलाकारांनी फुलपाखरू या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली.


फ्रेशर्स (Freshers)



कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा प्रवास एकत्र सुरू करणाऱ्या सात मित्रांची ही कथा फ्रेशर्स या मालिकेत दाखवण्यात आली होती. या मालिकेत मिताली मयेकर, अमृता देशमुख या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.


दे धमाल (De Dhamal)



2000 च्या सुरुवातीला दे धमाल ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत बालपणीच्या मैत्रीचे किस्से दाखवण्यात आले. या मालिकेत स्पृहा जोशी, प्रिया बापट, अनुराग वरळीकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेत या सर्व कलाकारांनी  बालकलाकार म्हणून काम केले.


संबंधित बातम्या


Friendship Day 2023 : 'अशी ही बनवा बनवी' ते 'दुनियादारी'; आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत 'हे' सिनेमे नक्का पाहा...