Ayesha Khan: 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणारी आयशा खान (Ayesha Khan) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयशाचा एक एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या बालपणाशी संबंधित एक धक्कादायक घटना सांगताना दिसत आहे. आयशानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ती 9 वर्षांची असताना एका व्यक्तीनं तिच्यासोबत वाईट कृत्य केलं होतं.
आयशानं सांगितली धक्कादायक घटना
आयशा खानने अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत तिच्यासोबत बालपणी घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. तिनं मुलाखतीमध्ये सांगितलं, "एक काका आले आणि त्यांनी मला बोलावले. मी विचारले, काय हवंय काका? त्यांनी मला एक पत्ता विचारला. मग त्यांना मी तो पत्ता सांगितला. मग त्यांंनी विचारले की, मी तिथे तुला घेऊन जाऊ शकतो का? मी त्यांना होकार दिला."
आयशा म्हणाली, "त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला"
पुढे आयशा म्हणाली, "ते काका आणि मी एका इमारतीत गेलो. तिथून खाली येत असताना त्यांनी अचानक मला पायऱ्यांवर ढकलले. यानंतर ते माझ्यावर जबरदस्ती करू लागले. त्या क्षणी मला समजत नव्हते की, काय होत आहे. पण काहीतरी चुकीचं घडतंय हे माझ्या लक्षात येत होतं. पण नक्की काय होतंय? ते मी समजू शकले नाही. 9 वर्षाच्या मुलीला हे सर्व समजू शकत नाही. मला ओरडता येत नव्हते. त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला. मीओरडण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांना म्हणत होते, माझी आई तिथेच उभी आहे. प्लीज काका मला जाऊ द्या."
आयशानं पुढे मुलाखतीत सांगितलं "अचानक त्या काकांच्या मनात काय आलं माहीत नाही, ते मला म्हणाले, इथेच उभी राहा मी फक्त दोन मिनिटात आलो. तो माणूस एका गेटमधून बाहेर जाताच. मी पळून आले." आयशानं सांगितलेली ही धक्कादायक घटना ऐकल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या सिद्धार्थ कन्ननच्या डोळ्यात देखील पाणी आलं.
पाहा व्हिडीओ:
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: