Fauji 2 trailer: बॉलिवूडचा बादशहा शाखरुख खान आता 59 वा वर्षांचा झाला आहे. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी चाहते मन्नतसमोर थांबतात तर काही सोशल मिडियावर अनोख्या पद्धतीच्या पोस्ट टाकत असतात. याला निर्माते आणि दिग्दर्शकही अपवाद नाहीत. नुकताच शाहरुखचा वाढदिवस साजरा करण्यासाठी Fauji2 च्या निर्मात्यांनी एक धमाकेदार ट्रेलर लाँच केलाय.या ट्रेलरमध्ये अनेक नवे कलाकार या मालिकेच्या बेंचमार्कला पुढे नेण्यासाठी सज्ज झालेले दिसतायत. या नोव्हेंबरमध्ये दूरदर्शनवर प्रीमियर होणार असलेल्या या  मालिकेसह, लोकांच्या आवडत्या क्लासिक मालिकेला आधुनिक ट्विस्टसाठी चाहते उत्सुक झाले आहेत.


फौजी या मालिकेत बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान यानं  अभिमन्यू राय ची भूमिका केली होती.  पण यावेळी या मालिकेच्या सिक्वेलमध्ये शाहरुख खानच्या ऐवजी टीव्ही अभिनेत्री अंकीता लोखंडे हिचा पती विकी जैन दिसणार आहे. त्यांच्या सोबत गौहर खानही प्रमुख भूमिकेत असतील.


फौजी २ चा ट्रेलर रिलीज


फौजी २ या मालिकेचा ट्रेलर सुरु हेातो तो गौहर खानपासून. ती रस्त्यावरून सायकल चालवत असते. आणि नंतर अचानक सगळं बदलून जातं. या मालिकेतले १० ॲक्टरर्स एक एक करून दिसतात जे कोणत्या ना कोणत्या गोष्टीत एक्सपर्ट आहेत. हे सगळे जण आर्मीमध्ये भरती होतात. ज्यांच्या ट्रेंनिगची जबाबदारी गौहर खानकडे असते. ट्रेलरमध्ये गौरह खान सुरुवातीला साध्या लुकमध्ये दिसते आणि नंतर आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये. हा लुक प्रेक्षकांना चांगलाच आवडल्याचं दिसतंय.


 






गौहर खानव्यतिरिक्त ही स्टारकास्ट


फौजी २ या मालिकेत गौहर खानशिवाय आशिष भारद्वाज, उत्कर्ष कोहली, अमरदीप फोगट, उदित कपूर, सुवंश धर, रुद्र सोनी, प्रियांशू राजगुरू, अयान मनचंदना, अमन सिंग दीप आणि नील सतपुरा आहेत. या शोमध्ये या सगळ्यांची भूमिकाही प्रमुख असल्याचं दिसतंय. पण याशिवाय या शोमध्ये आणखी एका अभिनेत्याचाही समावेश होणार आहे, जो या शोमधून पदार्पण करणार आहे. हा दुसरा कोणी नसून अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन आहे. विकी हा व्यवसायाने व्यावसायिक असून तो आता अभिनयाच्या जगात प्रवेश करणार आहे. मात्र, तो या शोमध्ये किती काळ असेल हे सांगता येत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की तो या शोमध्ये गौहरच्या पतीची भूमिका साकारणार आहे.


कधी होणार फौजी २ रिलिज?


गौहर खान आणि विकी जैन यांचा हा शो 18 नोव्हेंबरपासून सोमवार ते गुरुवार रात्री 9:00 वाजता दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होईल.