Bigg Boss 18: बिगबॉसच्या घरात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे . विवियन टाईम गॉड झाल्यानंतर त्याला नॉमिनेशनचेही अधिकार बिग बॉसने दिल्यामुळे घरात वादावादी आणि दोषारोपांची झड होती. दरम्यान, बिगबॉसच्या घरात एक महिना राहिल्यानंतर आता शेहजादा धामीने घरातून निरोप घेतला आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या एलिमिनेशनमध्ये शेहजादा घराबाहेर पडला आहे. घरातून बाहेर आल्या आल्या त्याने विवियनवर निशाणा साधलाय.
बिग बॉसच घर सोडताना काहीच वाटत नव्हतं.
घरातून बाहेर पडल्यानंतर शहजादाने व्हीव्हीएनवर निशाणा साधला. जेव्हा घरातून बाहेर पडलो त्यावेळी न्यूट्रल वाटत होतं. पण बिग बॉसच्या सगळ्या गोष्टी मला नंतर आठवणार आहेत असं शहजादाने सांगितलं. मी कधीही इतक्या लोकांसोबत घरात राहिलो नाही. माझे मित्रही तसे कमीच आहेत.
विवियनला इज्जतीत राहायला शिकवलं असतं..
मी लढण्यासाठी कायमच तयार होतो. बिग बॉसच्या घरात अशाच जी गणित तयार होत होती त्यामध्ये प्रेक्षकांनीही माझ्या आणि व्हीव्हीएम मध्ये झालेले वाद आणि उडालेले खटके पाहिले असतील. विवि यांच्या वागण्या बोलण्यात प्रचंड अकड आहे. जेव्हा येतो लोकांशी बोलतो तेव्हा तू कायमच उद्धट टोनमध्ये बोलतो. घरात असताना मी त्याला इज्जतीत राहिला शिकवलं असतं.
अनफिल्टर मित्र मला अधिक आवडले
माझे मुळातच मित्र कमी असल्याने जे स्पष्ट आणि मोकळे बोलतात त्यांच्याशी माझा चांगला जमलं. रजत च्या अन फिल्टर बोलण्यामुळे मी इम्प्रेस झालो होतो. नायरा ही मनाने साफ आहे. जो बोंड आम्ही घरात शेअर केला तो मी विसरू शकणार नाही.
विवियनच्या हातात नॉमिनेशनची पॉवर
बिगबॉस 18 चा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या रिॲलिटी शो मध्ये सध्या विवियन डिसेना टाईम गॉड बनला आहे. टाईम गॉड झाल्यापासून काही मोठे निर्णय घेताना तो दिसत आहे. या आठवड्यात तर विवियनला बिगबॉसने एक मोठी शक्ती दिली आहे. तो घरातील सदस्यांना या आठवड्यात नॉमिनेट करणार आहे. त्याने श्रुतिका आणि करणवीर मेहरा यांची नाव नॉमिनेशनसाठी घेतल्यानं काल घरात मोठा वाद झाल्याचं दिसलं.