मुंबई : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना दुसऱ्या सीझनसाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन लांबणीवर पडला आहे. आता बिग बॉसचा दुसरा मोसम एप्रिलऐवजी मे महिन्यात सुरु होणार आहे.


बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर, चाहते मागील वर्षापासूनच नव्या मोसमाची वाट पाहत होते. मागील वर्षी हा रिअॅलिटी शो एप्रिल महिन्यात सुरु झाला होता. पण यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन लांबणीवर पडला आहे.

Bigg Boss Marathi Season 2:  बिग बॉसच्या घराची जागा बदलली!

मागील वर्षी 15 एप्रिल रोजी बिग बॉसचं पहिलं पर्व ऑनएअर गेलं होतं. पण यंदा निर्मात्यांनी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला होता. आता लोकसभा निवडणुकीमुळे प्रेक्षकांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

आता पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांचं जबरदस्त सूत्रसंचालन, मराठी कलाकारांची दोस्ती-यारी आणि वाद-विवाद पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.