Disha Pardeshi : नव्या मालिकांच्या प्रवाहात झी मराठीवर (Zee Marathi) आणखी एक नवी मालिका सुरु होत आहे. 'लाखात एक आमचा दादा' (Lakahat Ek Amcha Dada) ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री दिशा परदेशी (Disha Pardeshi) ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांना तिच्या या मालिकेची बरीच उत्सुकता लागून राहिलीये. तसेच या मालिकेत ती अभिनेता नितीश चव्हाणसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. त्याविषयीची देखील अनुभव दिशाने सांगितला. 


दिशाने काय म्हटलं?


'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिशा परदेशी 'तुळजा' ची भूमिका दिशा साकारत आहे. तिच्याशी झालेल्या संवादात तिने आपल्या भूमिकेबद्दल आणि आपल्या खाजगी आयुष्याबद्दल संवाद साधला. यावेळी तिने म्हटलं की, "तुळजा एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे, स्वभावाने प्रामाणिक आणि अभ्यासात अतिशय हुशार आहे. इतर मुलींना ही अभ्यासासाठी प्रोत्साहित करते. तिला वाटतं की मुलगी शिकली तरच तिची प्रगती होईल आणि ती स्वतःच अस्तित्व ह्या जगात निर्माण करू शकेल. ती नम्र, सर्वांचा आदर करणारी आणि  समजूतदार आहे पण गरज पडली तर आरे ला कारे करणारी आहे.


तुळजाचा प्रवास कसा सुरु झाला?


तुळजाच्या प्रवासाविषयी सांगताना दिशाने म्हटलं की, ही भूमिका माझ्यापर्यंत येण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला. मागच्या वर्षी मी माझ्या एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला गेले होते. त्याचे नाव होते ‘मुसाफिरा’ चित्रपटाचे प्रोमोशन चालू झाले. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला एक दिवशी कॉल आला. तो कॉल वज्र प्रोडक्शनमधून होता.त्यांनी सांगितले की  त्यांची नवीन मालिका येत आहे जी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. त्या मालिकेतील मुख्य नायिकेसाठी तुमचा विचार करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्या भूमिकेसाठी योग्य आहात.मला ही गोष्ट आणि माझी भूमिका  ऐकून खूप वेगळी वाटली आणि असा तुळजाचा प्रवास सुरु झाला. 


'मी एकुलती एक मुलगी...'


दिशाने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना म्हटलं की, 'मला खासगी आयुष्यात  कोणीही दादा नाही  कारण मी माझ्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. पण मला चुलतभावंडे आहेत आणि त्यांच्यासोबत माझं नातं खूप प्रेमाचं आहे. मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की  'लाखात एक आमचा दादा' मध्ये जो माझ्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे ज्याचे नाव आहे शत्रू. शत्रू आणि तुळजाच मालिकेत कडवट नातं आहे पण खऱ्या आयुष्यात माझं आणि त्याच नातं एका मोठ्या भावा आणि लहान बहिणी सारखं आहे.'


दिशाचा सिनेप्रवास...


दिशाने तिच्या सिनेप्रवासाविषयी बोलताना सांगितलं की, मला या क्षेत्रात येऊन  तीन- साडेतीन वर्ष झाली. त्या आधी मी एक शास्त्रीय नृत्यांगणा होते. त्याआधी मी जवळपास 10 वर्ष मॉडेलिंग केलंय.  हळू हळू मॉडेलिंग सुटत गेलं आणि मी अभिनयाकडे वळले.


ही बातमी वाचा : 


Siddharth Jadhav : तू चाल पुढं...! मुंबईत भर पावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सिद्धार्थचा सल्युट; सेल्फी काढत शेअर केला व्हिडीओ