मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘दिल मिल गए’ मालिकेत जिग्नेश उर्फ जिग्गीची भूमिका साकारणारा अभिनेता करण परांजपे याचं मुंबईत निधन झालं. वयाच्या अवघ्या 26 वर्षीच त्याने जगाचा निरोप घेतला.
करण त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. झोपेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
करणने 'दिल मिल गए' में जिग्नेश उर्फ जिग्गीची भूमिका साकारली होती. हॉस्पिटलमधील मेल नर्सची त्याची व्यक्तिरेखा होता.
एकुलत्या एका मुलाने अचानक जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या आई-वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
त्याच्यासोबत मालिकेत काम केलेल्या करण वाहीने सोशल मीडियावर करणच्या निधनाची बातमी शेअर करुन श्रद्धांजली वाहिली.
करण परांजपेने ‘दिल मिल गए’शिवाय ‘संजीवनी’ मालिकेतही काम केलं होतं. तर अनेक मालिकांमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती.