कोलकाता: मीडिया स्ट्रीमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्स (Netflix) सध्या त्यांच्या वेब सीरिजमुळे खूपच चर्चेत आहे. ‘लस्ट स्टोरीज’नंतर आता नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स’ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहे.
मात्र आता नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही मालिका वादात सापडली आहे. कोलकात्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘सेक्रेड गेम्स’ च्या निर्मात्यांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोलकात्यातील गिरीश पार्क पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेस नेते राजीव सिन्हा यांनी नेटफ्लिक्स आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याविरोधात ही तक्रार केली आहे.
राजीव सिन्हा हे पश्चिम बंगाल काँग्रेस समितीचे सदस्य आहेत.या वेबसीरिजमध्ये केवळ राजीव गांधींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली नसून, तथ्यांचीही मोडतोड केली आहे, असा राजीव सिन्हा यांचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांनी या सीरिजच्या अभिनेता-निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काय आहे 'नेटफ्लिक्स'?
भारतात दोन वर्षापूर्वी नेटफ्लिक्स सुरु झालं. जानेवारी 2016 मध्ये मीडिया स्ट्रीमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्स (Netflix) भारतात लाँच झाली. 'नेटफ्लिक्स'मुळे तुम्हाला मागणीनुसार टीव्ही शो किंवा सिनेमे, वेबसीरिज ऑनलाईन पाहता येऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे दोनवर्षापूर्वी यासाठी महिन्याला 500 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. तसंच पहिला महिना ही सुविधा फुकटात दिली होती .
'नेटफ्लिक्स'मुळे मागणी केल्यानंतर तुम्ही कधीही, कुठेही कोणताही टीव्ही शो, नाटक, डॉक्युमेंटरी, वेब सीरिज किंवा सिनेमा ऑनलाईन पाहू शकाल. 'नेटफ्लिक्स' ही सुविधा 1997 मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात DVD रेंटल सर्व्हिस तत्वावर सुरु झाली होती. अमेरिकेत आजही 'नेटफ्लिक्स' सुरु असून या सुविधेने व्यापक रुप धारण केलं आहे.
भारतात याचा वापर कसा करता येईल?
'नेटफ्लिक्स'साठी तुम्हाला www.netflix.com/in/ या वेबसाटईला भेट देऊन तिथे तुमचं अकाऊंट ओपन करावं लागेल. तुम्ही रजिस्ट्रेशन करतानाच याचं पेमेंट करावं लागेल. यासाठी तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरू शकता.
संबंधित बातम्या
नेटफ्लिक्स भारतात लाँच, कधीही, कुठेही टीव्ही शो, सिनेमे पाहा !
आता नेटफ्लिक्स सांगणार, तुमच्या इंटरनेटचा स्पीड किती आहे?
नेटफ्लिक्सवरील Sacred Games वादात, नवाजुद्दीनविरोधात तक्रार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2018 04:24 PM (IST)
‘लस्ट स्टोरीज’नंतर आता नेटफ्लिक्सवर ‘सेक्रेड गेम्स’ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -