सुनील ग्रोव्हर आणि सनी लिओनी एकत्र झळकणार
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2017 01:21 PM (IST)

मुंबई : सुनील ग्रोव्हरच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल शर्मासोबतच्या भांडणानंतर 'द कपिल शर्मा शो'मधून मागील काही दिवसांपासून गायब असलेला सुनील ग्रोव्हर, पुन्हा एकदा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तुमचा आवडता कॉमेडियन आयपीएलमध्ये मसाला कॉमेंट्र करताना दिसेल. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑनी पण असेल. स्वत: सुनील ग्रोव्हरने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. सुनीलने ट्विटर लिहिलं आहे की, 'येत आहे, प्रत्येकाची चाहती, फॅन्स तिला बेबी डॉल म्हणतात. अंदाज लावा, मसाला कॉमेंट्रीसाठी मला कोण साथ देणार आहे?' https://twitter.com/WhoSunilGrover/status/850697484221460481 यानंतर सगळ्यांनाच समजलं की, ही बेबी डॉल म्हणजे सनी लिऑनी आहे. आयपीएलचं UC न्यूज अॅप बेस्ड कॉमेंट्री आहे. इथे हे दोन्ही स्टार्स 13 एप्रिलला लाईव्ह कॉमेंट्री करतील. गुरुवारी होणारा हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळवला जाईल. दरम्यान, कपिल शर्मासोबत विमानात झालेल्या भांडणानंतर सुनील ग्रोव्हर 'द कपिल शर्मा' शोमध्ये अजून परतलेला नाही. कपिल आणि इतर कॉमेडियन्सचे त्याला आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. संबंधित बातम्या...म्हणून सुनील ग्रोव्हर कपिलसोबत काम करण्यास तयार?सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटमकपिल शर्माला प्रेक्षकांना 10 मिनिटंही हसवता आलं नाही, शूटिंग रद्दप्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिटकपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायमसध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीटएअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तरकपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं