मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यापासून कपिल शर्माचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. या वादानंतर सुनीलने कपिलच्या शोला रामराम ठोकला. त्यानंतर शोचं प्रसारण करणाऱ्या सोनी टीव्हीनंही शोचा 106 कोटींच्या कराराला नुतनीकरण करण्यास नकार दिला. आता शोचा टीआरपीही घसरल्याने सोनी टीव्हीने कपिलला एक महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनीलने कपिलचा शो सोडल्यापासून कपिलच्या शोचा टीआरप घसरला आहे. 30 मार्च रोजी शूट झालेल्या शोमध्ये कपिलला प्रेक्षकांना 10 मिनिटात एकदाही हसवता आलं नाही. त्यामुळे कपिलला या शोचं शूटिंग रद्द करावं लागलं. यामुळे सोनीचे व्यवस्थापक कपिलवर नाराज आहेत. त्यांनी शोचा टीआरपी पुन्हा मिळवण्यासाठी कपिलला एक महिन्याची मुदत दिली आहे. एक महिन्यात टीआरपी मिळाला नाही, तर शो बंद करण्यात येईल, असा इशारा दिल्याचं समजतं आहे.

दरम्यान, सुनील ग्रोव्हर, चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुनंधा मिश्रा यांच्या शिवाय शो करताना कपिलची चांगलीच दमछाक होत आहे. सध्या या सर्व कलाकारांनी कपिल सोबत काम करण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कपिलवर शो बंद करण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे सुनील ग्रोव्हरने कपिलच्या शोला रामराम ठोकल्यानंतर शनिवारी दिल्लीत पहिला लाईव्ह कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. सुनीलने या शोमध्ये प्रेक्षकांना हसवून हसवून लोळवलं. त्यामुळे सुनील ग्रोव्हरची नाव सर्वेत्र चर्चेत आहे. तेव्हा कपिल आपला शो वाचवू शकतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कपिल शर्मा शोमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीने फारसा फायदा झालेला नाही. मागील आठवड्यात प्रसारित झालेले दोन्ही एपिसोड प्रेक्षकांना आवडले नाही. यू ट्यूबवरही या एपिसोडच्या व्ह्यूवरशिपमध्ये फारच घसरण झाली आहे. एवढंच नाही तर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या एपिसोडला नापसंती दर्शवली आहे.

दुसरीकडे सुनील ग्रोव्हर सोनी चॅनलच्याच इंडिया आयडॉलमध्ये डॉ. मशहूर गुलाटीच्या रुपातच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्याने या एपिसोडच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे.

संबंधित बातम्या

कपिल शर्माला प्रेक्षकांना 10 मिनिटंही हसवता आलं नाही, शूटिंग रद्द

प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट

कपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम

सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट

एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

…म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला?

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो?

कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर

कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं