'मी मुख्यमंत्री बोलतोय', फडणवीसांचा शेतकऱ्यांशी संवाद
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2017 07:46 AM (IST)
मुंबई : मुख्यमंत्र्यांना जनतेशी संवाद साधता यावा, म्हणून 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम टीव्हीवर सुरु होत आहे. आजपासून दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता डीडी सह्याद्री वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे. 'संकल्प शाश्वत शेतीचा' या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांकडून व्हॉट्सअॅप आणि ईमेलच्या माध्यमातून प्रश्न मागवण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या काही निवडक शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला आहे. राज्यातल्या 30 शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारता आले. पंतप्रधान नरेंद मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतील.