Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) चौथ्या आठवड्याची दणक्यात सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही आता एकमेकांवर कुरघोडी करण्यास सज्ज झाले आहे. आतापर्यंत शांत, संयमीपणे खेळ खेळणारे अभिजीत सावंत, पॅडी कांबळे, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर यांचा ग्रुप बी आता जसास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यातून त्यांनी घन:श्यामची चुगली निक्कीकडे केली. त्याची परिणीती दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आता अभिजीत सावंतमुळे अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे.


बिग बॉसच्या घरात आता तीन आठवड्यानंतर घरातील सदस्यांचे खरे रंग दिसू लागले आहेत. आजच्या भागात अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या सोमवारच्या एपिसोडमध्ये निक्की आणि घन:श्याममध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. आता आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला जाब विचारताना दिसत आहे,"तुला वाटतं का की मी मनापासून माफी मागत नाही", असा प्रश्न करते. त्यावर अभिजीत म्हणतो,"हा मला वाटतं ती मनापासून माफी मागते". प्रोमोत अभिजीतने निक्कीच्या नेमक्या त्याच प्रश्नाचे उत्तर दिले की निक्कीने आणखी कोणत्या प्रश्नाचे उत्तर दिले हे स्पष्ट झाले नाही. मात्र, अभिजीतने दिलेल्या उत्तरानंतर निक्कीला राग येतो. तर, निक्कीने अभिजीतसोबत चर्चा केल्याने अरबाजचा राग अनावर झाला असल्याचे प्रोमोत दिसून आले. निक्की आणि अभिजीतमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. अरबाज इतका संतापतो की, गार्डन एरियामध्ये तो बसलेल्या सोफ्यासमोरील वस्तूला जोराने हात मारतो.






बिग बॉसच्या घरात सध्या 'सत्याचा पंचनामा' हा टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एका रुममधील शेअरवर बसावे लागत आहे. त्यानंतर बिग बॉस त्या व्यक्तीबद्दल भाष्य करतात. त्यांच्या या मतावर दोन्ही गटांना सहमती, असहमती सांगायची असते. त्याशिवाय, बिग बॉसने सांगितलेल्या मताशी रुममध्ये असलेल्या सदस्यानेदेखील आपले मत व्यक्त करायचे आहे. विरोधी गटाचे मत आणि रुममधील सदस्याचे मत एकसारखे असले तर त्याला बीबी करन्सी मिळणार आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये आर्या जाधव आणि घन:श्याम दरोडे यांचा 'सत्याचा पंचनामा'टास्क झाला. या दोघांच्या टास्क दरम्यान जोरदार राडा झाला. आजच्या एपिसोडमध्ये उर्वरीत सदस्यांचा टास्क पूर्ण होणार आहे. या टास्कमध्ये निक्की ही मनापासून माफी मागते का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निक्की होय म्हणते. तर, अभिजीत सावंत नकारार्थी उत्तर देतो. त्यावरून आज घरात राडा होताना दिसणार आहे.