Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) ज्या प्रमाणे राडे आणि भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण या सगळ्यामध्ये घरात सुरु असलेल्या प्रेमाच्या वाऱ्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. निक्की अरबाज, वैभव इरीना यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच धन:श्याम (Ghanashyam Darode) आणि निक्कीच्या (Nikki Tamboli) व्हिडीओंमुळेही सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली.
आता या सगळ्यावर छोटा पुढारी अर्थातच घन:श्यामच्या आईची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. निक्कीने घन:श्यामला किस केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर त्या दोघांच्या संवादाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. या सगळ्यावर घन:श्यामच्या आईने अगदी भावनिक होत या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे.
निक्की आणि घन:श्याम बहिण भाऊ
घन:श्याम हा सध्या निक्की, अरबाज, वैभव यांच्या टीममध्ये आहे. त्यामुळे तो त्यांच्याच टीमसोबत राहिल असा असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटलं की, तो त्याच टीमसोबत राहिल की नाही हे माहित नाही. पण दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. निक्की आणि घन:श्याममध्ये फक्त बहिण भावाचं प्रेम आहे. लोकांना तो उगाच काहीतरी विषय वाटतोय.
बिग बॉसच्या घरात छोटा पुढारीचा खेळ
बिग बॉसच्या पहिल्या टास्कपासूनच घन:श्याम ही निक्की आणि अरबाजच्या टीमकडून खेळत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे घरातले त्याला डबल ढोलकी देखील बोलत आहेत. काहीच दिवसांपूर्वी घन:श्यामवर अंकितानेही तिचा राग व्यक्त केला होता. त्यावेळी तिने त्याला दोन सणसणीत ठेवून द्याव्याश्या वाटतात, असं म्हटलं होतं.
ही बातमी वाचा :
Rinku Rajguru : आर्ची मॅडमच्या स्टोरीवरचा मिस्ट्री मॅन कोण? पोस्ट पाहून चाहत्यांना पडले प्रश्न