Char Divas Sasuche: छोट्या पडद्यावरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. अनेक प्रेक्षक दररोज त्यांची आवडणारी मालिका न विसरता बघतात. मराठी मालिकांमध्ये सर्वाधिक काळ चाललेली मालिका कोणती? याबाबत जाणून घ्या...


चार दिवस सासूचे (Char Divas Sasuche) ही मालिका सर्वाधिक काळ चाललेली मराठी मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेनं 3,147 एपिसोड पूर्ण केल्यानं या मालिकेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 3000 पेक्षा जास्त एपिसोड चालणारी पहिली मालिका म्हणून नोंद झाली. 


चार दिवस सासूचे ही मालिका 3 ऑगस्ट 2020 पासून छोट्या पड्यावर पुनःप्रसारित करण्यात आली होती. रोहिणी हट्टंगडी, भार्गवी चिरमुले,प्रसाद ओक, कविता लाड, जयंत घाटे,प्राजक्ता दिघे,अभिजीत केळकर,मानसी नाईक,प्रिया मराठे यांसारख्या मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी या मालिकेत काम केलं. देशमुख कुटुंबाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती. 


2012 मध्ये कविता लाड यांनी उंच माझा झोकामध्ये या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही कारणामुळे कविता लाड यांनी चार दिवस सासूचे ही मालिका सोडली.त्या या मालिकेत अनुराधा रवी देशमुख ही भूमिका साकारत होत्या. त्यानंतर अभिनेत्री लेखा तळवलकर यांनी या मालिकेत अनुराधा रवी देशमुख  ही भूमिका साकारली.


चार दिवस सासूचे या मालिकेच्या टायटल साँगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेची निर्मिती बाबुराव बोर्डे, नरेश बोर्डे यांनी केली होती.26 नोव्हेंबर 2001 ते 5 जानेवारी 2013 या कालावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली.






रोहिणी हट्टंगडी यांनी चार दिवस सासूचे या मालिकेमध्ये साकारलेल्या आशालता प्रतापराव देशमुख या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तसेच या मालिकेत  पंकज विष्णू  आणि राजेश शृंगारपुरे यांनी रवी प्रतापराव देशमुख ही भूमिका साकारली होती. अभिनेते जयंत घाटे यांनी या मालिकेत प्रतापराव देशमुख ही भूमिका साकारली.


चार दिवस सासूचे या मालिकेसोबतच या सुखांनो या, अवंतिका, पुढचं पाऊल यांसारख्या मराठी मालिकांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Dnyanada Ramtirthkar: ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकरनं ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तुमच्या विचारांची...'