मुंबई : टास्क, भांडण, तंटा, रोमान्स, अशा अनेक कारणांमुळे कलर्स चॅनलवरील 'मराठी बिग बॉस' हा रिअॅलिटी शो जोरदार चर्चेत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक कन्टेस्टंट आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं म्हणजे मेघा धाडे. याच मेघाचा उद्या (23 मे) वाढदिवस आहे.
बिग बॉसच्या घरात एखाद-दुसराच स्पर्धक असेल, ज्याच्यासोबत मेघाचं भांडण झालं नाही. प्रत्येकावर हक्क गाजवणं, इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखणं, गॉसिप करणं यामुळे ती सगळ्यांच्याच निशाण्यावर असते. मेघाला सगळं येत, मेघाला सगळं कळतं, मेघाला सगळं माहिताय, असे टोमणेही तिला मारले जातात.
वाढदिवसानिमित्त मेघाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया...
- 23 मे 1988 रोजी जन्मलेल्या मेघाने वयाच्या अठराव्या वर्षी हिंदी मालिकांमधून अभियन करिअरची सुरुवात केली. तिने काही मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच ती निर्मातीही आहे.
- मूळची जळगावची असलेली मेघा धाडे घरच्यांचा विरोध झुगारुन मुंबईला आली. तिचे आई-वडील सिनेमातील करिअरच्या विरोधात होते. परंतु त्यांचा विरोध डावलून ती मुंबईला आली. स्ट्रगलिंगच्या काळात मुंबईत घर नसल्याने चार रात्र तिने रेल्वे प्लॅटफॉर्मवर काढल्या होत्या.
- पण लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्याने तिचा खरा संघर्ष सुरु झाला. ती गर्भवती असल्याच्या बातमीनंतर तिच्या वडिलांचा धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूचा दोष तिलाच देण्यात आला. मेघनाला साक्षी नावाची मुलगी आहे.
- मेघा सांगते की, 'लहान वयात माझ्या हातून काही चुका घडल्या होत्या. लग्नाआधीच मी आई बनल्यानंतर आयुष्य खूपच खडतर होत गेलं. यामुळे घरच्यांनीही मला दूर सारलं. पण मी न खचता माझं करिअर घडवलं.
- कुटुंबीयांच्या सांगण्यावरुन मेघनाने काही वर्षांपूर्वी लग्न केलं. तिचा पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेण्ट आहे. तिच्या पतीचं हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या लग्नापासून 15 वर्षांचा मुलगा आहे. या मुलासोबत माझं नातं मैत्रिणीसारखं असून तो मला नावानेच हाक मारते, असं मेघनाने सांगितलं.
- मेघनाला सख्खा भाऊ नसल्याने ती कोरिओग्राफर गणेश आचार्यला भाऊ मानते. दरवर्षी न चुकता ती गणेशला राखी बांधते.
संबंधित बातम्या
बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते
रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार
मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव....
बिग बॉसच्या घरातील हर्षदाच्या एन्ट्रीला भरभरुन प्रतिसाद
‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार?
राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'च्या घरातून बाहेर
बाहेर आल्यावर पहिल्यांदा बायकोला...... : राजेश शृंगारपुरे
'मराठी बिग बॉस'मध्ये आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री