Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) मध्ये घरात सध्या जोरदार राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली अरमान मलिकची (Arman Malik) पहिली पत्नी पायल मलिक वीकेंड का वार एपिसोडमध्ये आली होती. त्यावेळी तिने स्पर्धक विशाल पांडेवर गंभीर आरोप केले. त्यानंतर अरमान आणि विशालमध्ये बिग बॉसच्या घरात जोरदार राडा झाला.
पायलने विकेंड का वारमध्ये येऊन विशाल पांडे हा कृतिकावर वाईट नजर टाकत असल्याचा आरोप केला. दरम्यान पायलने विशालशी बोलताना म्हटलं की, 'तुम्ही कॅमेऱ्यात काहीतरी बोललात जे माझ्या मते खूप चुकीचं होतं. तुम्ही कृतिकाबद्दल जे बोललात ते मान्य नाही! ती एक आई आणि एक पत्नी आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.
अरमानने विशालच्या कानशिलात लगावली
पायल मलिकच्या या आरोपानंतर अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात या प्रकरणावरून जोरदार वादावादी झाली. यानंतर अरमानने रागाच्या भरात विशालला थोबाडीत मारली. अशा परिस्थितीत विशाल पांडेही अरमानसोबत भांडताना दिसला, मात्र कुटुंबीयांनी दोघांनाही थांबवले.
विशालने कृतिकाविषयी काय म्हटलं होतं?
लवकेश कटारियासोबत बोलताना विशाल पांडेने अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकवर टिप्पणी केली होती. यापूर्वी त्याने कृतिकाला सांगितलं की, 'तू मेकअपशिवाय चांगली दिसते. कृतिकाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर विशाल लवकेशला म्हणाला होता, वहिनी सुंदर दिसते आहे, म्हणजे मी चांगल्या हेतून बोलतोय.
अरमान आता घरातून बाहेर जाणार?
विशाल पांडेच्या या कमेंटवर अरमान मलिक चिडला आणि त्याने विशालच्या कानशिलात लगावली. पण बिग बॉसच्या घरामध्ये असं वर्तन करण्यास परवानगी नाही. असं केल्यास त्या स्पर्धकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले जाते. त्यामुळे आता अरमान मलिकवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.