Bigg Boss Marathi Winner Prize Money : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा आज ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर या टॉप 6 फायनलिस्टपैकी एकाचं नाव ट्रॉफीवर कोरलं जाणार आहे. आज रितेश देशमुख ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या विजेत्याची घोषणा करणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या विजेत्याला ट्रॉफीसोबत बक्षिसाची रक्कमही मिळते, ही बक्षिसाची रक्कम जाणून घेण्याचीही सगळ्यांना उत्सुकता आहे.
बिग बॉसच्या विजेत्याची बक्षिसाची रक्कम किती?
बिग बॉस मराठीच्या यंदाच्या विजेत्याला सुमारे 14.6 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, आधी बक्षिसाची रक्कम 25 लाख होती, जी सदस्यांना टास्कमध्ये जिंकायची होती, पण सदस्यांना फक्त 14.6 लाख रुपये जिंकता आले आहेत. आता आज बिग बॉसचा विजेता हीच रक्कम घरी घेऊन जाणार की बिग बॉस या रकमेत वाढ करणार हे आजच्या ग्रँड फिनालेमधेच कळेल. दरम्यान, याआधी बिग बॉस मराठी जिंकलेल्या सदस्यांना नेमकी किती रक्कम मिळाली ते जाणून घ्या.
बिग बॉस जिंकल्यावर शिव ठाकरेला किती रुपये मिळाले?
शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्या पर्वाच्या विजेत्यासाठी बक्षिसाची रक्कम 25 लाख रुपये होती, पण टॅक्स आणि इतर फीची काटछाट करुन त्याच्या हातात नेमकी किती रक्कम आली, हे शिव ठाकरेने सांगितलं. कॉमेडीयन भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये शिव ठाकरेने सांगितलं की, बक्षिसाची रक्कम 25 लाख रुपये होती. दोन स्पर्धकांनी शेवटचा टास्क हरल्यामुळे त्यातील 8 लाख रुपये कापले गेले. त्यानंतर शिल्लक रकमेमधील 35 टक्के सरकारला टॅक्स जातो, त्यानंतर उरले 17 लाख आणि माझ्या अकाऊंटवर आले 11.5 लाख.
कपडे, स्टालिस्ट आणि विमान खर्चाचे पैसे कापले
याशिवाय, शोमध्ये वापरलेल्या कपड्यांचेही पैसे वेगळे द्यावे लागले. स्टायलिस्टसाठी पैसे द्यावे लागणार, हे माहित नव्हतं. इतकंच नाही, तर आई-बाबा पहिल्यांदा विमानाने मुंबईत आलेल्या विमानाच्या तिकीटाचे पैसे ही बक्षिसाच्या रकमेतून भरावे लागले, असाही खुलासा शिव ठाकरेने यावेळी केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :