Bigg Boss Marathi : आज बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात विकेन्डचा दुसरा डाव रंगणार आहे. या विकेन्डच्या डावाचे प्रोमो समोर आले आहेत. यात महेश मांजरेकर सुरेखा आणि उत्कर्षची शाळा घेताना दिसून आले आहेत. त्या दोघांची मांजरेकरांनी चांगलीच बोलती बंद केली आहे. या आठवड्यात स्पर्धकांनी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. एकमेकांवर आवाज चढवत, टास्कमध्ये नको ते कृत्य करताना स्पर्धक दिसून आले होते. 


प्रोमोमध्ये महेश मांजरेकर सुरेखाला म्हणत आहेत, "सुरेखा कुडची तु...इकुडची की तिकुडची" असं म्हणत सुरेखाची  मांजरेकरांनी बोलतीच बंद केली आहे. त्यानंतर मांजरेकर उत्कर्षला सुनावताना दिसून येत आहेत. उत्कर्ष समुद्रात पोहायला गेल्याचा त्रास झाला तुला कधी? त्यावर उत्कर्ष म्हणतो,  "सर ते मिठाचं पाणी होतं." त्यावर मांजरेकर म्हणाले, "मिठाचं पाणी काही प्रॉब्लेम नव्हता. मिरचीची धुरी चालते ना तिथे.. डिड यू स्टॉप इट..यू आर द मोस्ट पार्शिअल संचालक."


टास्कने झुकले की, आपल्या तावडीत सापडतात आणि कंपलीटली लटकतात. भल्या भल्यांची बोबडी वळते. या आता आपल्या बिग बॉसच्या चावडीवरती असं देखील महेश मांजरेकर एका प्रोमोत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या विकेन्डच्या डावात काय घडणार हे आजच्या भागात दिसून येणार आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या  घरात "हल्लाबोल" आणि "खुलजा सिमसिम"चे कार्य पार पडले होते. मिरचीची धुरी, शॅम्पूचं पाणी, स्वीमिंग पूलमधलं पाणी, पावडर, स्प्रे अशा अनेक गोष्टी करत स्पर्धक खेळताना दिसून आले. 


"खुलजा सिमसिम"च्या कार्यात कॅपटनचीनिवड करायची होती. जय आणि गायत्रीने कॅप्टन बनण्यासाठी सदस्यांना विणवण्या करण्याचा प्रयत्न केला. पण घरातील काही सदस्यांना ते दोघेही कॅप्टन म्हणून नको होते. अशाप्रकारे हे कार्य यशस्वी करण्यात स्पर्धक अयशस्वी झाले आहेत.  त्यामुळे बिग बॉसचे घर या आठवड्यात कॅप्टनविना असणार आहे.


आज होणार "बिग बॉस 15" चा ग्रॅंड प्रीमिअर
बिग बॉस हा सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या रिअलिटी शो मधील एक आहे. "बिग बॉस 15" चा ग्रॅंड प्रीमिअर होणार आहे. याआधी बिग बॉसच्या पहिल्या लाइव्ह-स्ट्रीमिंगचे नाव बिग बॉस ओटीटी ठेवण्यात आले होते. बिग बॉसच्या या पर्वात प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट, शमिता शेट्टी,तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अक्शा सिंह, डोनल बिष्ट, उमर रियाज, सिंबा नागपाल, साहिल श्रॉफ, निशा अय्यर, विशाल कोटियन आणि विधि पंड्या हे स्पर्धक सहभागी होणार आहेत. आजपासून रात्री 9:30 वाजता "बिग बॉस 15"चा प्रीमिअर कलर्स चॅनलवर प्रसारित होणार आहे.