Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉसचा (Bigg Boss Marathi Season 5) खेळ हा आता लवकरच संपणार असल्याची अधिकृत घोषणा नुकतीच बिग बॉसकडून करण्यात आली आहे. यावर स्पर्धकांना देखील मोठा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉसचा खेळ हा 100 दिवसांचा असतो. याआधीचेही चार सीझन हे 100 दिवसांचेच होते. पण आता बिग बॉसचा पाचवा सीझन हा 70 दिवसांतच आटोपता घेणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 


हा सीझन रंजक होण्यासाठी बिग बॉसकडून ट्विस्ट आणण्यात आला. त्यामुळे बिग बॉसचे दिवस कमी करण्यात आले आहेत. यावेळी बिग बॉसने म्हटलं की, 'हा सीझन पूर्वीसारखा 100 दिवसांचा नसणार आहे. तो 10 आठवड्यांचा म्हणजेच 70 दिवसांचा होईल. त्यामुळे येत्या 14 दिवसांत बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. म्हणजेच येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस सीझन 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.'


सर्व सदस्य झाले नॉमिनेट


घरातील सगळे सदस्य या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. कारण आता बिग बॉसचा खेळ पुढच्या 14 दिवसांत संपणार आहे. त्यामुळे बिग बॉसकडूनच सगळे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तसेच या आठवड्यात ज्या सदस्यांची निर्णय क्षमता नाही त्या सदस्यांना टार्गेट करण्यात आलं. यामध्ये घरातील जवळपास सगळ्याच सदस्यांनी निक्कीला टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं. 


बिग बॉसच्या घरात सध्या वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक राहिले आहेत. त्यामुळे आता यापैकी कोण फायनलचं तिकीट मिळवणार आणि कुणाला घरची वाट दाखवली जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.                                                                                   






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : अखेर शिक्कामोर्तब झालं! बिग बॉस 70 दिवसांतच खेळ आटोपणार, समोर आली अधिकृत माहिती; कारण अद्यापही अस्पष्ट