Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएल्टी शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या शोचे होस्टिंग महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करणार आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनची उत्सुकता चांगली ताणली  गेली आहे. जवळपास दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शो ऑन एअर जाण्यास सज्ज झाला आहे. बिग बॉस ओटीटीवर सध्या सलमान खान (Salman Khan) ऐवजी अनिल कपूर (Anil Kapoor) होस्टिंग करत आहेत. बिग बॉसचा कोणता होस्ट लय भारी कोणता आहे, यावर अभिनेता रितेश देशमुखने स्पष्टच उत्तर दिले.


कलर्स मराठी वाहिनीवर 28 जुलैपासून 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सुरू होणार आहे. आधीच्या चार सीझनमध्ये दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी शोच्या होस्टिंगची जबाबदारी पार पाडली होती. आता,  या पाचव्या सीझनमध्ये रितेश देशमुखकडे शोच्या होस्टिंगची जबाबदारी असणार आहे. मराठी बिग बॉसचा होस्ट बदलल्यानंतर हिंदीतील 'बिग बॉस ओटीटी'च्या शोच्या होस्टिंगची जबाबदारी सलमान खानऐवजी अनिल कपूर यांच्याकडे आहे. या दोघांमधील चांगला होस्ट कोणता असा प्रश्न रितेश देशमुखला विचारण्यात आला. त्यावर रितेशने मनमोकळेपणाने उत्तर दिले. 






सलमान खान की अनिल कपूर? कोणता होस्ट लय भारी?


बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रितेश देशमुखला सलमान खान आणि अनिल कपूरबाबत प्रश्न विचारण्यात आले. शोच्या होस्टिंगबाबत बोलताना रितेशने सांगितले की, सलमान खानसारखा होस्ट कोणी होऊ शकत नाही.त्याची बॉडी लँग्वेज, संवाद साधण्याची शैली प्रभावी आहे. शोच्या वेळी स्पर्धकाचा रागरंग पाहून तुम्हाला भूमिका घ्यावी लागते. सलमान खान हे त्यानुसार भूमिका घेतो. सलमान खान हा सध्याचा जगातील बेस्ट होस्ट असल्याचेही रितेशने सांगितले. 






प्रत्येकाची एक स्टाईल....


अनिल कपूर यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रितेशने म्हटले की, अनिल कपूर यांची एक वेगळी पद्धत आहे. त्यानुसार ते होस्टिंग करत आहेत. बिग बॉस मराठीचे होस्टिंग करताना माझी एक वेगळी स्टाइल असणार आहे. एक चांगलं होस्ट होईल असा प्रयत्न करेल असेही रितेशने म्हटले.