Jahnavi Killekar : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला (bigg boss Marathi Season 5) काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून यावेळी वेगवेगळ्या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. अगदी पहिल्याच आठवड्यापासून सुरुवात झाली. निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर या दोघींनीही पहिल्याच दिवसापासून भांडणं, राडे या सगळ्याला सुरुवात केली होती. पण घरात एन्ट्री करण्यापूर्वी जान्हवीच्या प्रतिक्रियेने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
जान्हवीने तिच्या बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली की, माझी सुरुवात फार छोट्या गोष्टीपासून झाली होती. मी माझ्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. माझ्या आयुष्यात महाराष्ट्राची खलनायिका ही एक टॅगलाईन झाली आहे. मी आता हिरोईन वगैरे काही करूच शकत नाही. आता तुम्ही मला सगळे पाहाल की जान्हवी खऱ्या आयुष्यात कशी आहे ते."
'जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर...'
जान्हवीने पुढे म्हणाली, "मी घरात कसलीही प्लॅनिंग करून चालले नाही कारण आपण करतो एक आणि वास्तवात होत एक म्हणून मी काही तयारी केली नाही. मी अतिशय शांत डोक्याने जात आहे. घरातल्यांसोबत मी अगदी छानपणे राहीन कारण मी खूप गुणी आहे. पण जर कोणी माझ्या डोक्यात गेले तर मी त्याला सोडणार नाही."
'प्रवास मजेदार होईल'
जान्हवीने सांगितले की, "घरात फोन नसणार हे समजल्यावर मला थोडे आश्चर्यच वाटले. मला नाही माहिती की आता 100 दिवस घरात काय करणार. माझी काय अवस्था होणार कारण.. मी कायम फोनवर असते. आता या सगळ्यापासून एका वेगळ्याच जगात जायचे आहे जिथे वेगवेगळ्या स्वभावाची माणसे भेटणार आहेत. त्यांना कसे डील करायचे ते समजणे कठीण आहे पण प्रवास मजेदार होईल."
'मी माझ्या घरीही काम करत नाही'
जान्हवीने घरच्यांना सांगितले तेव्हा ती म्हणाली, "सगळ्यांना शॉक बसला. सगळे मला म्हणाले जमणार का तुला? पण माझे घरचे एकदम खुश आहेत, विशेषतः माझा मुलगा. माझा मुलगा मला म्हणाला जा आणि मजा कर." जान्हवीने घरातल्या कामांबद्दल सांगितले की, "मला कोणतीच काम करायला आवडत नाही. मी माझ्या घरीही काम करत नाही, पण आता करावं लागेल. माझ्या जाण्याने गोंधळ होणार आहे, पण सगळ्यांना मनोरंजन नक्कीच करीन."