Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi Season 5) आता चौथा आठवडा सुरू झाला असून सदस्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्यांनी तीन आठवड्यातच नाती निर्माण केली आहेत. छोटा पुढारी घन: श्याम दरोडे (Ghanshyam Darode) आणि निक्की तांबोळीमध्ये (Nikki Tamboli) बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळाले. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रेक्षकांना या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे. निक्की आणि छोटा पुढारीमध्ये मोठा वाद झाला आहे. आता ही कडाक्याचा वाद खरा आहे की चहाच्या पेल्यातील वादळ आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.
'बिग बॉस मराठी'घरात वीकेंडला झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांबाबत प्रेक्षकांची मते काय आणि घरातील सदस्य एकमेकांमागे काय चर्चा करत असतात, हे समोर आले. त्यामुळे आता घरात जरा वेगळं वातावरण तयार झाले आहे. घरात आधीच दोन गट आहेत. त्या गटांमध्येही वाद होणार असल्याचा अंदाज होत. कलर्स मराठीच्या नव्या प्रोमोनुसार, छोटा पुढारी घन:श्याम दरोडे आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद झाले आहेत.
निक्की आणि घन:श्याम दरोडे उडाले खटके
प्रोमोमध्ये निक्की घन:श्यामला म्हणतेय,"तू फेक आहेस". त्यावर घन:श्याम तिला विचारतो,"काय फेक वागलोय ते तर सांग.. तू किती आपली आहेस हे अख्ख्या जनतेला दिसतंय... तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता मी.. यावर निक्की म्हणते,"नको देऊ. त्यावर घन:श्याम म्हणतो,"निक्कू ताई बोलल्यामुळेच घात झालाय ना". यावेळी घन:श्याम बराच दुखावला असल्याचे दिसते. आता, निक्की-घन:श्यामच्या वादाचे कारण काय, ही भांडणं किती मोठी आहेत, हे आजच्या एपिसोडमध्ये दिसून येईल.
निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. दोघांचेही मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग होते. आम्ही दोघे बहीण -भाऊ म्हणत छोट्या पुढारीने निक्की सोबत मैत्री केली. पण दोघांच्या पप्पी आणि झप्पीमुळे प्रेक्षकांनी त्यांची खिल्ली उडवली होती. आता ऐन रक्षाबंधनच्या दिवशीच त्यांच्यात मोठा वाद झाला आहे.
योगिता चव्हाण आणि निखिल दामले 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर!
'बिग बॉस मराठी'च्या घरात या आठवड्यात डबल एविक्शन पार पडलं आहे. त्यामुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण या दोन सदस्यांचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातला प्रवास संपला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात निखिल दामले, योगिता चव्हाण, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार होती.