Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसरा सीझन संपल्यापासून प्रेक्षक चौथ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्याने चौथा सीझन कोण होस्ट करणार आणि कोणते स्पर्धक या सीझनमध्ये सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आता कलर्स मराठीने नवा प्रोमो शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 'बिग बॉस मराठी 4'च्या सूत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सांभाळणार आहेत. 


कलर्स मराठीने महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे प्रोमो शेअर केले आहेत. यात मांजरेकर म्हणत आहेत,"खेळाडू नवे, घर नव्हे.. आणि होस्ट?  वर्गात विद्यार्थी नवीन असतात. पण मास्तर तोच महेश वामन मांजरेकर. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये मी घेणार आहे 'वेगळी शाळा' बिग बॉस मराठी लवकरच कलर्स मराठीवर". महेश मांजरेकर 'बिग बॉस मराठी 4' होस्ट करणार असल्याने चाहते आनंदी झाली आहेत. 


चौथा सीझन महेश मांजरेकर होस्ट करणार? सिद्धार्थ जाधव करणार की आणखी कोणता नवा चेहरा समोर येणार यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.  मागील तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. गतवर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकरांनी आजारपणामुळे काही भागांमधून ब्रेक देखील घेतला होता. त्यामुळे चौथ्या सीझनची धुरा महेश मांजरेकर सांभाळतील का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. 


पिपिंग मूनला दिलेल्या एका मुलाखतीत मांजरेकर म्हणाले होते, मी काही या बिग बॉस शोचा बांधील नाही. माझा तीन वर्षांचा करार होता. मी तीन वर्ष इमानेईतबारे हे काम केलं. हा मला आताही त्यांनी घेतलं तर, करायला आवडेल. मी तितक्याच मेहनतीने ते काम करेन. पण, जर दुसरं कुणी होस्ट करणार असेल, तर मी त्यालाही प्रोत्साहन देईन आणि तितक्याच उत्साहाने हा कार्यक्रम बघेन".


बिग बॉस मराठीचे तिन्ही सीझन महेश मांजरेकरांनी चांगलेच गाजवले आहेत. त्यांची बोलण्याची आणि स्पर्धकांची शाळा घेण्याची शैली प्रेक्षकांना विशेष आवडली. पण आता नव्या सीझनमध्ये मांजरेकर वेगळी शाळा घेणार असल्याने प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’च्या सूत्रसंचालनाची धुरा दुसऱ्याच अभिनेत्याच्या हातात? पाहा काय म्हणाले महेश मांजरेकर...


Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! चौथा सीझन लवकरच येणार भेटीला