मुंबई : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) पाचवा सीझन सध्या सुरु आहे. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून तुफान चर्चेत आहे. सीझनचा दुसरा आठवडा आज संपत आला आहे. भाऊच्या धक्क्यावर शनिवारी रितेश देशमुखने सदस्यांची शाळा घेतली. रितेश भाऊ जान्हवीवर चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं तर, निक्की गँगलाही त्यानं चांगलं झापलं. आज भाऊच्या धक्क्यावर मनोरंजनाचा तडका लागणार आहे. रितेश भाऊच्या धक्क्यावर आज बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावून कल्ला करताना पाहायला मिळणार आहे.
मोबाईल फोनमधून सदस्यांचं सीक्रेट बाहेर पडणार?
अभिनेता अक्षय कुमार 'खेल खेल में' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीच्या घरात टीमसह हजेरी लावताना दिसणार आहे. अक्षय कुमारसोबतच भाऊच्या धक्क्यावर तापसी पन्नू, वाणी कपूर, फरदीन खान, प्रज्ञा जैस्वाल, एमी विर्क आणि आदित्य सील हे कलाकारही हजेरी लावणार आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर खिलाडी कुमार सदस्यांसोबत मस्ती करताना दिसणार भाऊच्या धक्क्यावर खिलाडी अक्षय कुमार सदस्यांच्या मोबाईल फोनमधील मेसेज वाचून त्यांची गुपित उघड करणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या सदस्यांचे सीक्रेट्स उघड होणार हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत.
खिलाडी कुमार वाचणार आर्याचे मेसेज?
बिग बॉस मराठीमध्ये आज भाऊच्या धक्क्यावर अभिनेता अक्षय कुमार रॅपर आर्याच्या फोनमधले मेसेज वाचणार आहे. पण आर्या मात्र अक्षयला जोरात मेसेज वाचून दाखवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे आता खिलाडी कुमार आर्याचे मेसेज वाचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा भाऊचा धक्का नक्की पाहा.
जान्हवीचं सत्य समोर आणताच तिला आली भोवळ
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून. जान्हवी किल्लेकरने हा दुसरा आठवडा चांगलाच गाजवला. रितेश भाऊने शनिवारच्या भागात तिची चांगलीच शाळा घेतली. तर आजच्या रविवारच्या भागातही तो तिचं सत्य समोर आणणार आहे. पण रितेश भाऊ जान्हवीचं सत्य समोर आणताच तिला भोवळ येते. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :