Bigg Boss Marathi :  बिग बॉस (Bigg Boss Marathi New Season) मराठीच्या दुसऱ्या आठवड्यात कुणीही घराच्या बाहेर पडलं नाही. दुसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण, निखिल दामले, योगिता चव्हाण, निक्की तांबोळी, घनश्याम दरोडे, पंढरीनाथ कांबळे ही मंडळी घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये होती. पण यापैकी कुणीही घराबाहेर गेलं नसलं तरी तिसऱ्या आठवड्या घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी ही मंडळी थेट नॉमिनेट झाली आहे. 


'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. सर्वच सदस्यांची खेळी 'बिग बॉस' प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. घरातील सदस्यांचं मनोरंजन, टास्क, भावना आणि ट्विस्टने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अभिजीत आणि अरबाजला पाच पॉवरकार्ड मिळणार आहे.


वीकेंडला अभिजीत आणि अरबाजने 'बिग बॉस मराठी'चं तंटाघर चांगलच गाजवलं. आजच्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"अरबाज आणि अभिजीत आपल्यासमोर आहेत पाच पॉवरकार्ड्स". यावेळी अभिजीत म्हणतोय,"बिग बॉस' मी सेफसाठी पॉवरकार्डचा वापर करतोय". तर अरबाजही म्हणतोय,"बिग बॉस' मी सेफसाठी पॉवरकार्ड वापरतोय". अरबाजच्या या निर्णयावर निक्की म्हणते,"चुकीचा निर्णय". त्यामुळे अरबाजने घेतलेला निर्णय एकंदरीतच निक्कीला पटलेला नाही. 






'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगणार मैफिल


'बिग बॉस मराठी'च्या बाथरुममध्ये मैफिल रंगणार आहे.'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात धनंजय पोवार आणि अभिजीत सावंत 'दीवाना है देखो' हे गाणं म्हणताना दिसणार आहेत. या गाण्यावर सूरज आणि इरिना थिरकताना दिसतील.


सूरजने शड्डू ठोकला, चॅलेंज केलं...


गार्डन एरियामध्ये सूरज आणि अभिजीत चव्हाण गप्पा मारत असतात. त्यावेळी सूरज चव्हाण म्हणतो की, आता जोशात खेळणार. नडतो मी ह्यांना... असं नडतो ना, परत म्हणतील बारीक आहे पण लैय बेक्कार आहे असे म्हणतील. यावेळी सूरजचा रोख हा निक्की-अरबाजच्या ग्रुपवर असल्याचे म्हटले जाते. निक्की-अरबाज यांचा ग्रुप हा इतर सदस्यांवर अरेरावी करत असल्याचा आरोप नेटकरी करतात. 'भाऊचा धक्का'मध्येही होस्ट रितेश देशमुखने त्यांच्या ग्रुपची खरडपट्टीच काढली आहे. आता, सूरजनेच चॅलेंज केले आहे. 


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : बारीक हाय, पण लय बेक्कार हाय...नडतो ना ह्यांना आता; गुलिगत सूरज चव्हाणचं निक्की-अरबाजच्या ग्रुपला चॅलेंज!