Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. पण यंदाचं बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं. अखेर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 


बिग बॉस मराठीची क्रेझ दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन आठवड्यांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे आता एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा कार्यक्रम मागे पडला होता. त्यामुळे या कार्यक्रमात नव-नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न चॅनलने केला. 


'या' दिवशी रंगणार ग्रॅंड फिनाले (Bigg Boss Marathi Season 4 Grand Finale Date) : 


बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता होती. पण यंदाचे स्पर्धक चाहत्यांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडले. त्यामुळे हा कार्यक्रम आपली जादू दाखवण्यात कमी पडला. अखेर आता हा कार्यक्रम संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आता ग्रॅंड फिनाची चाहत्यांना उत्सुकता आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा 8 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर होणार आहे. 






बिग बॉसच्या घरात आता फक्त सात सदस्य राहिले आहेत. यात किरण माने (Kiran Mane), प्रसाद जवादे (Prasad Jawade), अक्षय केळकर (Akshay Kelkar), अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अमृता धोंगडे (Amruta Dhongade), राखी सावंत (Rakhi Sawant), आरोह वेलणकर (Aroh Welankar) या सदस्यांचा सहभाग आहे. या आठवड्यात दोन सदस्य प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकतात. 


प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'रमा राघव' (Rama Raghav) : 


बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता किंवा विजेती कोण होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार असून आता 9 जानेवारीपासून 'रमा राघव' (Rama Raghav) ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून चाहत्यांना आता मालिकेची उत्सुकता लागली आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : 'ऑल इज वेल' म्हणत 'बिग बॉस'चं दार उघडलं; स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री?