Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकताच एक टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये जो जिंकेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरणार आहे.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉस सांगतात, घरातील एका एरियामध्ये जो सदस्य सर्वप्रथम जाणार त्या सदस्याला कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार. तो एरिया आहे कॅप्टन्स रुम' बिग बॉसच्या या घोषणेनंतर घरातील काही सदस्य कॅप्टन्स रुमकडे धावतात.
पाहा प्रोमो:
आज घरात अमृता धोंगडे, अक्षय आणि समृद्धी योगेशबद्दल बोलताना दिसणार आहेत. नक्की अमृता आणि अक्षयला योगेशचा राग का आलाय ? त्याचं कारणं आज कळेलच पण अक्षय त्याबाबत अमृता आणि समृद्धीशी चर्चा करताना दिसणार आहे. अक्षय सांगताना दिसणार आहे, तुम्हांला माहिती आहे मला तो काल काय म्हणाला ? तू खरंच रडूबाई आहेस रे, नाटक करतोस. नाटक करायचं असतं तर मी काल आई बाबांचा फोटो घेऊन रडत बसलो असतो drama संपल्यानंतर. हर मर्द को दर्द होता है, और में वो छुपाने वाला मर्द नही हूं! समृद्धीचे म्हणणे आहे, तो चांगला माणूस आहे, त्याचा पण struggle आहे. अक्षय म्हणाला, पण असं म्हणणं चुकीचे आहे ना ? अमृता म्हणाली, आम्ही तिघे जरी बसलो असू ना तरी तो म्हणे तू beautiful आहेस, तू हॉटच आहेस मग तिला सारखं बोलत बसायचं. मी काय बावळट आहे का? ती सगळ्यांपेक्षा उजवी आहे असेल तिचा स्वभाव आहे चांगला... मला देखील मान्य आहे मी मैत्रीण आहे तिची. पण हे काय आहे दरवेळेस. मला म्हणे हीचा स्वभाव चांगला आहे तुझं बोलणं चांगलं नाही. मी म्हंटलं माझं बोलणं असंच आहे. मी तोंडावर बोलते जे काही असेल ते मला नाही जमंत... "
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: