Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात. वीकेंडला होणाऱ्या चावडीमध्ये महेश हे स्पर्धांसोबत चर्चा करतात. आता नुकताच या कार्यक्रमाच्या आजच्या भागाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धक एकमेकांसोबत भांडत आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांमध्ये होणार तुफान राडा. प्रोमोमध्ये दिसत आहे की, किरण माने विकासला म्हणाले "अरे तू शेपूट आहेस, आहेस का?" आणि इथून घरात वादाची ठिणगी पडली. मेघा घाडगे म्हणाल्या, "हे शब्द बोलायची गरज आहे का ? जो बोलतो आहे त्याला बोलत नाही आहेस तू.' किरण माने म्हणाले, "तो किती सहन करणार ? चार पाच दिवस सहन करतो आहे तो.' त्यावर अपूर्वा भडकली. ती म्हणाली, 'ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे?' आणि भांडणं वाढतंच गेलं.
आता हा वाद कुठवर गेला? पूढे काय झालं ? हे आजच्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
पाहा प्रोमो:
बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार आणि रविवार रात्री 9. 30 वाजता प्रेक्षक पाहू शकतात. हा कार्यक्रम कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर तुम्ही पाहू शकता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Bigg Boss Marathi 4 : आज 'बिग बॉस'च्या घरात पडणार पैशांचा पाऊस; रंगणार पहिलं कॅप्टन्सी कार्य!