Bigg Boss Marathi 4: बिग बॉस यांनी सदस्यांवर काल सोपवले रोख ठोक हे कार्य. काल मिळालेल्या चार कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये कार्य रंगणार असून त्यांच्यामध्ये आज पेटणार शाब्दिक युद्ध. आज उमेदवार त्यांची मते मांडणार असून इतर सदस्य देखील साक्षिदार म्हणून या कार्यात सहभागी होणार आहेत. उमेदवार पर्यायी वकील यांची भूमिका निभावणार असून या कोर्टाचा जज असणार आहे कॅप्टन रोहित शिंदे. 


किरण माने यांचे म्हणणे आहे, ज्यावेळेस चांगली माणसं आपल्यापासून तुटतात आणि आपल्या ग्रुपमध्ये वादंग निर्माण करणारी, गढूळता निर्माण करणारी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपणं आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. निर्णय क्षमता नसल्याने तुमच्यापासून माणसं तुटतात. मॅडमना (तेजस्विनीला) असं वाटतं कि, बिग बॉस हा गेम फक्त शक्तीचा आहे. पण हा गेम शक्तीचा नसून तितकाच युक्तीचा, बुद्धीचा देखील आहे. तर युक्ती पण येऊ देत तुमच्याकडे. चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा म्हातारा माणूस येऊ देत तुमच्याकडे. पण त्यांना युक्ती अत्यंत फालतू वाटली आणि म्हणनूच त्यांनी युक्तीची दोन माणसं काढून टाकली आणि एक confusing माणूस घेतला हा lack of decision मेकिंग आहे असं मला वाटतं. आता या सगळ्यावर तेजस्विनीचे काय म्हणणे हे बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना कळेल. 


बिग बॉसच्या आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये अमृता आणि अपूर्वा यांच्यामध्ये शाब्दिक लढाई झालेली दिसत आहे. 






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Vaishali Thakkar Case : वैशाली ठक्कर प्रकरणात एक्स-बॉयफ्रेंड राहुल नवलानी पोलिसांच्या ताब्यात, आरोपी पूजाचा शोध सुरु