Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी सीझन 4' (Bigg Boss Marathi 4) हा धम्माल रिअॅलिटी शो फिनालेपासून अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर आहे. घरात 12 वा आठवडा सुरु आहे. या दरम्यान घरातील प्रत्येक सदस्य जीव तोडून खेळायचा प्रयत्न करतोय. प्रत्येकजण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत फिनालेची शर्यतीत आपलं स्थान निर्माण करू पाहतोय. अशातच बिग बॉसच्या घरात आज कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. आणि यासाठी सदस्यांनी प्रत्येक सेकंदाची किमत मोजावी लागणार आहे.
'फॅमिली विक'मध्ये घरातील सदस्य झाले भावूक
नुकताच घरात 'फॅमिली विक' हा टास्क झाला. या निमित्ताने घरातील सदस्य आपल्या घरच्यांना भेटून फार भावूक झाले. फॅमिली टास्क हा बिग बॉसच्या घरातील सर्वात महत्त्वाचा आणि इमोशनल असा टास्क असतो. या टास्कची घरातील स्पर्धकांबरोबरच प्रेक्षकही आतुरतेने वाट बघत असतात.
आता घरात कॅप्टनपद मिळविण्यासाठी घरातील सदस्यांना प्रत्येक सेकंदांची किंमत मोजावी लागणार आहे. यावरून बिग बॉसच्या घरातील 12 व्या आठवड्याच्या कॅप्टनपदी कोणते उमेदवार उभे राहणार आहेत हे समजणार आहे.
पाहा व्हिडीओ :
'हे' सदस्य झाले नॉमिनेट
सध्या घरात एकूण सात सदस्य आहेत. अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, राखी सावंत, किरण माने आणि प्रसाद जवादे हे सदस्य फिनालेच्या रेससाठी उभे आहेत. तर या आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी प्रसाद जवादे आणि आरोह वेलणकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :