Bigg Boss 16 : सलमान खानचा (Salman Khan) वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस'चं 16 वं पर्व (Bigg Boss 16) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बिग बॉसच्या घरात सध्या 16 स्पर्धक धुमाकूळ घालत आहेत. यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झाले असून प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करणार आहेत. 


बिग बॉस पहिल्यांदाच खेळाडूच्या भूमिकेत दिसणार. या पर्वात हाऊसमास्टर गेम खेळणार असून सर्व स्पर्धकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी चर्चा हे पर्व सुरू होण्याआधीपासून होत होती. पण 'बिग बॉस 16'च्या पहिल्या भागात वेक अप सॉंग लागल्यानंतर स्पर्धकांनी डान्स करायला सुरुवात केली. त्यावेळी बिग बॉस म्हणाले, यापुढे वेक अप सॉंग लागणार नाही. ही शेवटची वेळ असेल". 






सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"15 वर्षांत बिग बॉस पहिल्यांदा त्यांचाच नियम मोडणार. कारण आता ते स्वत: या पर्वात त्यांचा खेळ खेळणार आहेत". बिग बॉसच्या घरात आधीच स्पर्धकांचं मनोरंजन होण्यासाठी टीव्ही किंवा मोबाईल नाही. अशातच बिग बॉसने वेक अप सॉंग लागणार नसल्याचं जाहीर केल्याने पहिल्याच दिवशी स्पर्धक नाराज झाले आहेत. 


'बिग बॉस 16'मध्ये कोणत्या स्पर्धकांचा सहभाग? 


छोटी सरदारनी फेम निमरित कौर अलुवालिया, गायक अब्दू राजिक, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर चौधरी, रॅपर 'एम सी स्टॅंन' , अचर्ना गौतम, अभिनेता गौतम विग, शालिन भनोट, 'इमली' फेम सुंबुल तौकीर, भोजपुरी अभिनेत्री सौंदर्या शर्मा, 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे, सुंबुल तौकीर, 'मिस इंडिया रनर अप' मान्या सिंह, राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी, टीना दत्ता, श्रीजिता डे, बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान हे स्पर्धक 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाले आहेत. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 16 : अखेर प्रतीक्षा संपली! दिमाखात पार पडला 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड प्रीमियर; जाणून घ्या कोणते स्पर्धक सहभागी


Bigg Boss Marathi 4 : मराठमोळा फेटा अन् कटिंग चहा, यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राईज!