Bigg Boss 18:  सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) या रिॲलिटी शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा शो 6 ऑक्टोबरला प्रीमियर होणार आहे आणि त्याआधी 'बिग बॉस 18' शी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. निया शर्मा या कार्यक्रमासाठी पहिली कन्फर्म स्पर्धक आहे. त्यातच आता या शोसाठी निर्मात्यांनी एका अभिनेत्रीशी संपर्क साधला असल्याची माहिती समोर आलेली आहे. 


ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वाकानी आहे. झी न्यूजच्या वृत्तानुसार, दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानी हिला बिग बॉसची ऑफर देण्यात आल्याचं माहिती समोर आलेली आहे.  या शोचा भाग होण्यासाठी अभिनेत्रीला याआधीही अनेकदा संपर्क साधण्यात आला होता, परंतु प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही तिने याला नकार दिला आहे.


अभिनेत्रीने 65 कोटी नाकारले


रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 18' चा भाग होण्यासाठी निर्मात्यांनी दिशा वकानीला आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम ऑफर केली होती. अभिनेत्रीला शोमध्ये 65 कोटी रुपयांची फी ऑफर करण्यात आली होती पण तरीही दिशाने 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होण्यास नकार दिला.


चाहते दया बेनच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत


आम्ही तुम्हाला सांगूया की दिशा वकानी दीर्घकाळापासून सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये दया बेनच्या भूमिकेत लोकांचे मनोरंजन करत होती. जेव्हा अभिनेत्री गर्भवती झाली, तेव्हा ती प्रसूती रजेवर गेली, त्यानंतर ती शोमध्ये परतली नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या निर्मात्यांनी अनेकदा दावा केला आहे की दिशा परत येणार आहे, मात्र अद्याप तसे झालेले नाही.


'बिग बॉस 18' च्या प्रीमियरची तारीख


'बिग बॉस 18' बद्दल बोलायचे झाले तर हा शो कलर्स टीव्हीवर 6 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. निया शर्मा व्यतिरिक्त धीरज धूपर, शोएब इब्राहिम आणि चाहत पांडे या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या आहेत.


चाहते पाहतायत दयाबेनची वाट 


दिशा वकानी दीर्घकाळापासून सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये दया बेनच्या भूमिकेत लोकांचे मनोरंजन करत होती. जेव्हा अभिनेत्री गर्भवती झाली, तेव्हापासून ती रजेवर गेली. त्यानंतर दिशा शोमध्ये परतलीच नाही. तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोच्या निर्मात्यांनी अनेकदा दावा केला आहे की दिशा परत येणार आहे, मात्र अद्याप तसे झालेले नाही.


'बिग बॉस 18' च्या प्रीमियरची तारीख


'बिग बॉस 18' बद्दल बोलायचे झाले तर हा शो कलर्स टीव्हीवर 6 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. निया शर्मा व्यतिरिक्त धीरज धूपर, शोएब इब्राहिम आणि चाहत पांडे या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या आहेत.


ही बातमी वाचा : 


Urmila Matondkar : एकीकडे मोहसीन अख्तरसोबत घटस्फोट, दुसरीकडे बिग बॉस 18 मध्ये घेणार एन्ट्री? उर्मिला मातोंडकर पुन्हा चर्चेत