Bigg Boss 17 Episode Day 1 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) धमाकेदार सुरुवात झाली आहे. नुकताच या पर्वाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. 'बिग बॉस'मध्ये यंदा 17 स्पर्धक सहभागी झाले आहेत.  'दिल, दिमाग और दम' अशी यंदाची थीम आहे. या थीमवर आधारित मोहल्ला 1, मोहल्ला 2 आणि मोहल्ला 3 या भागात स्पर्धक राहत आहेत. यावरुन पहिल्याच भागात 'बिग बॉस 17'मधील स्पर्धक गोंधळलेले दिसले. 


'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करताच ईशा आणि अभिषेकचं कडाक्याचं भांडण


'बिग बॉस 17'च्या पहिल्या भागाची सुरुवातच अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि ईशा मालवीय (Isha Malviya) यांच्या घरातील एन्ट्रीने झाली. सर्व स्पर्धकांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर मनारा चोप्रा त्यांना कुठे राहायचं याबद्दल विचारते. त्यावर ईशा म्हणते की, अभिषेकसारखी जागा नाही निवडणार. तर दुसरीकडे ईशा अनकंफर्टेबल होऊ नये म्हणून अभिषेक दिमाग या मोहल्ल्याची निवड करतो. त्यानंतर जागा निवडण्यावरुन ईशा आणि अभिषेकचं कडाक्याचं भांडण होतं. दोघेही एकमेकांसोबत जोरजोरात भांडतात. इतर स्पर्धक मात्र त्याची मजा घेतात. 






'बिग बॉस' अंकिताला (Ankita Lokhande) घर आवडलं का याबद्दल विचारतात. अंकिताही तिला घर आवडल्याचं सांगते. त्यानंतर बिग बॉस अंकिताला माइकचा वापर करायला सांगतात आणि म्हणतात,"याआधी तुम्ही असं घर, असा खेळ आणि असा बिग बॉस कधीही पाहिला नसेल. त्यानंतर घरातील सर्व स्पर्धक टाळ्या वाजवतात.  बिग बॉसने अंकिता त्यांची आवडती स्पर्धक असल्याचं जाहीर केलं आहे.


स्वयंपाकाच्या कामावरून राडा...


स्वयंपाकाच्या कामावरुन बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये राडा झाला आहे. त्यानंतर बिग बॉस सना रईस खानला कंफेशन रुममध्ये बोलावतात. रईस खानला 'बिग बॉस'ला सांगतात की, ब्रेन रूममध्ये राहणारी मंडळी घरातील सदस्यांना कामं वाटून देतील. त्यानंतरही सनी आणि अभिषेकचं भांडण होतं. 


बिग बॉसने घेतली विकीची शाळा


'बिग बॉस 17'च्या पहिल्याच दिवशी बिग बॉसने अंकिता लोखंडेचा पती विकी जैनची (Vicky Jain) शाळा घेतली आहे. तसेच हे पर्व कंटाळवाणं होऊ न देण्याचं बिग बॉसने घरातील सर्व स्पर्धकांना ठणकावून सांगितलं आहे. विकी पुढे-पुढे करत असल्याने बिग बॉसने त्याला फटकारलं. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : पहिल्यांदाच तीन घरांत रंगणार 'बिग बॉस 17'चा खेळ! आलिशान घर, थीम अन् स्पर्धक; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...