Big Boss 16 : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Big Boss 16) हा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. यापूर्वी साजिद खान आणि गोरी नागोरी यांच्यात वाद झाला होता. सौंदर्या शर्माला लपून-छपून घरचे राशन दिल्याबद्दल साजिदने गोरीला फटकारले. एवढेच नाही तर साजिदला गोरीच्या वागण्याचीही अडचण आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये, सौंदर्या शर्माने गोरी आणि साजिद यांच्यातील गोष्टी सोडविण्याचा विचार केला. मात्र साजिद खानच्या एका वाक्याने मुद्दा बनला.  

किचन परिसरात साजिद खान आणि गोरी नागोरी यांच्यात वाद झाला. दरम्यान, साजिद म्हणाला, "तू राजस्थानची डान्सर आहेस आणि मी झोपडपट्टीत वाढलो आहे." साजिदचा 'डान्सर' हा शब्द ऐकून अर्चना त्या शब्दाचा वेगळाच अर्थ काढते. यावर तिने मुद्दा उपस्थित केला आणि साजिदला ती डान्सर नसून कलाकार असल्याचे सांगते. हे प्रकरण इतकं वाढलं की, शिव ठाकरेबरोबरही वाद झाला. मात्र, गोरी साजिदच्या डान्सर शब्दाचा चुकीचा अर्थ घेत नाही. परंतु, अर्चना काहीतरी वेगळाच अर्थ काढून या शब्दाचा मुद्दा बनवते. 

अर्चनाला बिग बॉसने फटकारले

यावरून घरात शिव आणि अर्चना यांच्यात वाद होतो. बिग बॉस अर्चनाला कन्फेशन रूममध्ये बोलावतात आणि तिला विचारतो की साजिद आणि गोरी स्वयंपाकघरात काय बोलत होते आणि याबाबत तिला काय माहित आहे. अर्चनाने आपल्याला हे प्रकरण माहित नसल्याची कबुली दिली आहे. ती 'डान्सर'च्या चर्चेवर बोलली हे तिने स्पष्ट केले. यावरून बिग बॉसने तिला फटकारले आणि म्हटले की, बिग बॉसच्या घरात कोणताही धर्म, जात, वर्ग किंवा व्यवसाय याबद्दल बोलले जाणार नाही किंवा त्याला मुद्दा बनवले जाणार नाही. 

प्रियांकानेही केला खुलासा 

घडलेल्या वादानंतर प्रियांका सौंदर्या आणि गोरीला सांगते की, अर्चना 'डान्सर'कडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहते. म्हणूनच तिने हा मुद्दा बनवला. पुढे साजिदनेही केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले की, 'डान्सर' हा शब्दाचा अर्थ चुकीचा नव्हता. मी सर्व क्षेत्राचा आदर करतो. असे साजिदने स्पष्ट केले.   

महत्वाच्या बातम्या : 

Shehnaaz Gill: 'हा चित्रपट पाहून मी रडले'; 'ऊंचाई' चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना