Bigg Boss 15 Winner : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. यंदाच्या बिग बॉसमध्ये अनेक रंजक ट्विस्ट होते. 'बिग बॉस 15'चा  (Bigg Boss 15) विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटच्या क्षणी तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. तेजस्वीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे तेजस्वी या मोसमाची विजेती ठरली.


अंतिम पाच स्पर्धकांंमध्ये शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, निशांत भट, आणि प्रतीक सहजपाल यांचा समावेश होता. हे स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत वेगवेगळे डावपेच आखताना पाहायला मिळाले. महाअंतिम सोहळ्याचा शेवटचा क्षण हा खूप भावस्पर्शी आणि भावनिक बघायला मिळाला. 


 महाअंतिम सोहळ्यात 'बिग बॉस 13' चा (Big Boss 13) विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) ट्रिब्यूट दिला गेला. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडणाने, कधी रडण्याने, कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आणले होते. पण आता हा प्रवास संपला आहे.


कोण आहे तेजस्वी प्रकाश?
तेजस्वी प्रकाशचे कुटुंब संगीत कलेच्या खूपच जवळचे आहे. मात्र तेजस्वी ही एक अभियंता आहे. पण अभिनयाच्या आवडीमुळे तिने अभियंत्याची नोकरी सोडून दिली. त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून न पाहता आपल्या करिअरमध्ये मार्गक्रमण केले. तेजस्वीने '2612' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे.  मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत. 'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.