Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या 'ही पाइपलाईन तुटायची नाय' या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या टास्कसाठीची पहिली उमेदवार ठरली आहे. या टास्कदरम्यान घरातील काही सदस्य टास्क अनिर्णित कसा राहिल असा प्रयत्न करताना दिसले, असे बिग बॉसने जाहीर केले. आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार ते कळणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्कमध्ये सदस्य भान हरपून खेळतात. त्यामध्ये आपल्याला किंवा आपल्यामुळे दुसर्याला दुखापत तर होत नाहीना याची काळजी घ्यायचा त्यांना विसर पडतो. तरी टास्क दरम्यान बिग बॉस वारंवार सूचना देत असतात एकेमकांना इजा होईल असे काही करू नका.
आज बिग बॉस गायत्रीला सुचना देणार आहेत. बिग बॉस गायत्रीला म्हणाले, "बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले, आजचे कार्य पार पाडताना आपल्याला दुखापत झाली. तसेच पुढील किमान तीन आठवडे आपल्याला स्लिंग घालायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याचसोबत टास्क खेळण्यासाठी देखील मनाई केली आहे. आता आपल्याला त्वरित आराम मिळणे जास्त आवश्यक आहे".
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर शुक्रवारी घरातील काही सदस्यांमध्ये ही चर्चा नक्कीच रंगते की या आठवड्यात कोणता सदस्य घरी जाण्याची शक्यता आहे वा गेला पाहिजे, या सदस्याने वेळ देऊन देखील हवातसा गेम नाही दाखवला वैगरेवैगरे... आजदेखील घरात उत्कर्ष आणि मीरामध्ये हीच चर्चा रंगली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha