मुंबई : सालाबादप्रमाणे अभिनेता सलमान खान यंदाही 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करणार आहे. बिग बॉसच्या तेराव्या पर्वाचं सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान किती मानधन घेणार, हे ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. सलमान संपूर्ण पर्वासाठी जवळपास दोनशे कोटी रुपये घेणार असल्याची माहिती आहे.
सलमानने 'वीकेंड का वार'च्या प्रत्येक एपिसोडची फी साडेसहा कोटींपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच दर आठवड्याला सलमान 13 कोटी रुपये घेणार आहे. बिग बॉसचा प्रत्येक सिझन 105 दिवस म्हणजेच 15 आठवडे चालतो. त्यानुसार 195 कोटी रुपयांची कमाई सलमान करणार आहे.
एका आठवड्याला 'वीकेंड का वार'चे दोन एपिसोड शूट केले जातात. दोन्ही भागांचं चित्रीकरण एकाच दिवशी केलं जातं. या एपिसोडमध्ये सलमान 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी केलेल्या चांगल्या-वाईट कामांचा आढावा घेतो. चांगल्या कामाचं कौतुक आणि वाईट वर्तनावर शब्दाचा मार अशी ही पद्धत असते.
गेल्या वर्षी सलमान दर आठवड्याचे अकरा कोटी रुपये घेत होता. यावर्षी मात्र त्याने आपल्या मानधनात वाढ केली आहे. याचाच अर्थ गेल्या पर्वात सलमानने 165 कोटी रुपयांची कमाई केली होती.
बिग बॉस 13 साठी कोणाकोणाच्या नावांची चर्चा?
1. अभिनेत्री झरीन खान
2. अभिनेता चंकी पाण्डे
3. अभिनेता राजपाल यादव
4. लव्हयात्री चित्रपट फेम अभिनेत्री वरिना हुसैन
5. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी
6. अभिनेत्री अंकिता लोखंडे
7. अभिनेता राकेश वशिष्ठ
8. पॉर्नस्टार डॅनी डी
9. बिग बॉस बांगलाचा सूत्रसंचालक जीत
10. खासदार आणि अभिनेता चिराग पासवान
11. बॉक्सर वीजेंदर सिंग
12. मॉडेल राहुल खंडेलवाल
13. मॉडेल हिमांश कोहली
14. अभिनेत्री मेघना मलिक
15. सीआयडी फेम दया - अभिनेता दयानंद शेट्टी
16. मिथुन चक्रवर्तीचा मुलगा - अभिनेता महाअक्षय चक्रवर्ती
17. फॅशन डिझायनर रितू बेरी
18. गायिका-मॉडेल सोनल चौहान
19. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला
20. मेक अप आर्टिस्ट आणि एलजीबीटी समुदायाचे प्रतिनिधी फैझी बू
'बिग बॉस 13'च्या सूत्रसंचालनासाठी सलमानला मिळणार दोनशे कोटी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2019 01:33 PM (IST)
सलमानने 'वीकेंड का वार'च्या प्रत्येक एपिसोडची फी साडेसहा कोटींपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच दर आठवड्याला सलमान 13 कोटी रुपये घेणार आहे.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -