Big Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील पहिला आठवडा पार पडल्यानंतर आता घरातील सदस्य काय धिंगाना घालतील याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यातील 'जोडी की बेडी'चा टास्क चांगलाच गाजत असतो. हा टास्क करत अतसाना स्पर्धकांसह प्रेक्षकांनादेखील मज्जा येत असते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात 'जोडी की बेडी' हा टास्क पार पडल्यानंतर त्या 'जय - विरू'च्या जोड्या शेवटपर्यंत चाहत्यांच्या आवडीच्या ठरल्या होत्या. 


'जोडी की बेडी'च्या टास्कमध्ये स्पर्धकांना बिग बॉस जोड्या निवडून देतात. त्या जोड्यांसोबत स्पर्धकांना पूर्ण एक आठवडा राहावे लागते. त्यामुळे स्पर्धकांना अधिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. 'जोडी की बेडी' च्या टास्कमध्ये स्पर्धकांना एकमेकांसोबत बेडीत 
अडकवण्यात आले आहे. या एकमेकांसोबत बेडीत अडकवणाऱ्या जोड्या बिग बॉसनेच नेमून दिल्या आहेत. या जोड्या एकमेकांसोबत एक आठवडा कशा पध्दतीने राहणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. 


जोडी की बेडी टास्कमध्येच स्पर्धकांना हल्लाबोल हा देखील टास्क देण्यात आला. हा हल्ला बोल टास्कदेखील नेमून दिलेल्या जोड्यांसोबतच खेळावा लागणार आहे. या टास्कमध्ये दोन स्पर्धक म्हणजे एक जोडी बाईकवर बसते. तर इतर स्पर्धकांना त्यांना जबरदस्तीने उठवायचे आहे. त्यामुळे बाईकवरील स्पर्धकांना उठविण्यासाठी इतर स्पर्धक वाटेल ते पदार्थ त्यांच्या अंगावर टाकत आहेत. तसेच या आठवड्यात नॉमिनेशन टास्कदेखील पार पडला आहे. जय, मीनल, गायत्री, शिवलीला, आविष्कार हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.
या नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांना आपली बाजू सर्वांपूढे मांडण्याची तसेच नॉमिनेट न झालेल्या स्पर्धकाला नॉमिनेट करण्याची संधी बिग बॉसने दिली होती. तसेच या नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांनी नॉमिनेट केलेल्या स्पर्धकांनादेखील त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात
आली होती. 


'जोडी की बेडी'च्या टास्कनंतर बिग बॉसच्या घरात तयार झालेल्या जोड्या


बिग बॉस मराठीच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात अनेक जोड्या तयार झाल्या होत्या. त्यानंतर आता तिसऱ्या पर्वात कोणत्या जोड्या पाहायला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजेश श्रुंगारपुरे आणि रेशम टिपनीस, वीणा जगताप आणि शिव ठाकरे, सई लोकुर आणि पुष्कर जोग, पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले या जोड्या बिग बॉसच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वात पाहायला मिळाल्या होत्या.