मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' शो सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या सर्वात पसंतीचा शो ठरला आहे. या शोमध्ये बिग बींना भेटल्यानंतर अनेक स्पर्धक भावुक झाल्याचं आपण नेहमी पाहतो. पण नुकत्याच शूट झालेल्या शोमधील एका घटनेमुळे बिग बी अमिताभ बच्चन अतिशय भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.


वास्तविक, येत्या 11 ऑक्टोबर रोजी महानायक अमिताभ बच्चन अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्त केबीसीच्या टीमनेही मोठी जय्यत तयारी केली होती. अमिताभ बच्चन यांना सप्राईज देण्यासाठी केबीसीच्या टीमने बिग बींच्या शाळेतील आठवणींना शोदरम्यान उजाळा दिला.

अमिताभ बच्चन यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एक खास व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ पाहून बिग बींच्या शालेय जीवनातील आठवणी ताज्या झाल्या. या व्हिडीओत बिग बींनी आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणीही सांगितल्या होत्या. हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर बिग बी अतिशय भावुक झाले होते.

विशेष म्हणजे, यानंतर बिग बींचे सर्वात आवडते सितार वादक नीलाद्री कुमार यांनी आपल्या संपूर्ण टीमसोबत सितार वादनातून बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ पाहा