या आठवड्यात मैथिली जावकर, अभिजीत केळकर, पराग कान्हेरे, नेहा शितोळे, वीणा जगताप, माधव देवचक्के नॉमिनेट झाले आहेत. त्यापैकी मैथिली जावकर किंवा माधव देवचक्के या दोघांपैकी एकजण घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मैथिली जावकर चोर-पोलीस खेळामध्ये संचालक म्हणून अपयशी ठरली होती. तसेच त्यावेळी झालेली मारामारी ती थांबवू शकली नाही. मैथिलीच्या खेळामध्ये पारदर्शकता नसल्याची टीकादेखील केली जात आहे. कोणत्याही खेळात, वादात किंवा चर्चेत तिचा सहभाग नसतो. बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे असते. मैथिली त्यामध्ये कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मैथिली जावकर बेघर होण्याची शक्यता जास्त आहे.
माधव देवचक्केदेखील घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. माधवला बिग बॉसच्या घरातील खेळ नीट समजलेला दिसत नाही. तसेच तो नेमका कोणाच्या बाजूने आहे, हे देखील अद्याप समजलेले नाही. बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घडामोडींमध्ये त्याच्याकडे त्याचा स्वतःचा आहे का? हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. त्यामुळे देवचक्केलादेकील घराबाहेर पडावे लागू शकते.
दरम्यान बिग बॉसच्या घरातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. 7 मे रोजी प्रसारित झालेल्या भागात अनेक वाद झाले. वीणा जगताप आणि शिवानी सुर्वेमध्ये झालेल्या वादामुळे बिग बॉसनी दोघींनाही अडगळीच्या खोलीत राहायला सागितले होते. परंतु तब्येतीचे कारण देत शिवानीने बिग बॉसची आज्ञा पाळण्यास नकार दिला. परंतु शिवानीने अडगळीच्या खोलीत जाण्यास नकार दिला तर शिवानीसह इतरांनाही परिणाम भोगावे लागतील अशी घोषणा बिग बॉसनी केल्यानंतर शिवानी अडगळीच्या खोलीत जाण्यास तयार झाली.
अडगळीच्या खोलीत शिवानीसोबत बोलायला गेल्यालेल्या नेहासोबत तिचे भांडण झाले. भांडणांच्या या आराखड्यात सगळ्यांपासून अलिप्त असलेल्या पराग आणि रुपालीमध्ये कांदे-पोहे प्रश्नोत्तरांचा खेळ रंगला. यावेळी तुला लाईफ पार्टनर म्हणून शेफ आवडेल की अभिनेता? असा प्रश्न परागने रुपालीला विचारल्यानंतर 'एक अभिनेता जो शेफ आहे' असे उत्तर रुपालीने दिले.
सतत होणाऱ्या वाद-भांडणांमध्ये रुपाली-परागची लव्हस्टोरी खुलणार का? याचीदेखील सर्वांना उत्सुकता आहे. शिवाय या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार? याकडेही लक्ष आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये मैथिली जावकर घराबाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे.