Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आतापर्यंतच्या सीझनमध्ये यंदाच्या सीझनचा टीआरपी सर्वाधिक आहे. बिग बॉस मराठीच्या घरात्लीससदस्यांचा कल्ला आणि होस्ट रितेश देशमुखचा भाऊचा धक्का प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचवा आठवडा सरत आला आणि आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत.  


भाऊच्या धक्क्यावर डान्सचा तडका


बिग बॉस मराठीमध्ये (Bigg Boss Marathi New Season) आज भाऊच्या धक्क्यावर (Bhaucha Dhakka) सदस्य वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. सूरजची झापुक झुपक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर अभिजीत आणि निक्कीचा कपड डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. सर्व जोड्यांचा कल्ला पाहण्यासाठी 'बिग बॉस प्रेमी' खूप उत्सुक आहेत. 


निक्की-अभिजीतची घट्ट मिठी


या आठवड्यातील जोड्यांच्या बंधनात सर्वाधिक चर्चित जोडी म्हणजे अभिजीत आणि निक्की. आजच्या भागात निक्की आणि अरबाजचा कपल डान्स करत एकमेकांना  मिठी मारताना पाहायला मिळणार आहे. 'ये कैसा लड़का हैं' या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत. 






अरबाज-आर्याचा कपल डान्स


आज भाऊच्या धक्क्यावर सगळे डान्सचा तडका लावणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांपैकी कोणाचा अंदाज भारी ठरणार? हे आजच्या भागात कळेल. आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये भाऊच्या धक्क्यावर मनोरंजन खास होणार आहे. अरबाज आणि आर्या हे आज कपल डान्स करताना दिसणार आहेत. यावेळी त्यांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारल्याचं पाहायला मिळत आहे.


निक्की-अभिजीतचा कपल डान्स : पाहा व्हिडीओ



महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bigg Boss Marathi : 'बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका'; रितेश भाऊवर नेटकरी भडकले