Bigg Boss Marathi New Season Day 25 : 'बिग बॉस मराठी'च्या खेळात कॅप्टन पद अतिशय महत्त्वाचे मानलं जातं. कॅप्टन असलेल्या व्यक्तीकडे विशेषाधिकार असतात. त्याशिवाय कॅप्टनला एका आठवड्याच्या नॉमिनेशनपासून बचाव होतो. कॅप्टनला घरातील निर्णय घेण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे ज्या टीममधील सदस्य कॅप्टन होईल, त्या टीमलादेखील त्याचा फायदा होतो. 


अरबाज कॅप्टन्सी गमावणार? 


बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) पाचव्या पर्वात पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) झाली होती. त्यानंतर दुसरा कॅप्टन कोणता सदस्य होणार, यासाठी बिग बॉसच्या घरात फारच रोमांचक टास्क पार पडला. यानंतर अखेर अरबाज पटेल (Arbaaz Patel) बिग बॉस मराठीच्या घरातील दुसरा कॅप्टन ठरला. पण आता अरबाजच्या कॅप्टन्सीवर टांगती तलवार असल्याचं समोर आलं आहे. अरबाज कॅप्टन पद गमावू शकतो, असं नवीन प्रोमोमधून समोर आलं आहे.


अरबाजच्या स्वार्थापायी इतर सदस्यांना मोठा फटका बसणार?


'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. अरबाज पटेलच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये 'बिग बॉस' अरबाजला म्हणत आहेत, "अरबाज बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम्स सोईसुविधा विकत घेऊ शकतात. त्याबदल्यात आपलं कॅप्टन पद गमवावं लागेल. आता आपल्याला आपला फायदा निवडायचा आहे किंवा घराचा फायदा".    


बिग बॉस बघतायेत मनाचा इरादा, अरबाज पाहणार का स्वतःचा फायदा? 






अरबाजने कॅप्टन्सी गमावल्यावर टीम A चं काय होणार? 


अरबाज आता घराचा फायदा निवडणार की स्वत:चा फायदा निवडणार हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, अरबाज कॅप्टन पद गमावणार असल्याने निक्की मात्र हैराण झाली आहे. अरबाजने कॅप्टन्सी गमावल्यास टीम A ला मोठा फटका बसणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे आता अरबाजच्या स्वार्थापायी इतर सदस्यांना मोठा फटका बसणार का हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


श्रेयस तळपदे आधी 'या' अभिनेत्यांच्या मृत्यूची अफवा, जिवंत असल्याचं द्यावं लागलं होतं स्पष्टीकरण