Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं (Apurva Nemlekar) 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अपूर्वाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अपूर्वानं बिग बॉस मराठी सीझन 4 (Bigg Boss Season 4) या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. नुकतीच अपूर्वानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं बिग बॉसच्या घरातील अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अपूर्वानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दिसत आहे. या व्हिडीओला अपूर्वानं कॅप्शन दिलं, 'गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 4 सुरू झाला होता आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तसे पाहता बिग बॉसमध्ये 100 दिवस टिकून राहण म्हणजे एक मोठा खडतर दिव्यप्रवास असतो. मात्र या शंभर दिवसात मला माझ्यामधली मी जशी आहे तशी आणि माझा मूळ स्वभाव जसा आहे तसा प्रेक्षकांना पाहता आला. यापूर्वी अनेक सीरियल, नाटक, फिल्मद्वारे वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकासमोर माझा अभिनय सादर केला. त्याला प्रेक्षकानी भरभरून प्रतिसाद ही दिला. तथापि बिग बॉस एक असा कार्यक्रम आहे. तिथं आपल्याला अभिनय करता येतं नाही. त्यामध्ये तूम्ही original जसे आहात तसेच प्रेक्षकाना दिसता. जे अभिनय करतात. किंवा खोटं खोटं वागण्याच्या प्रयत्न करतात ते लवकरच घराबाहेर जातात मी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी कोणतीही strategy ठरवली नव्हती. मी माझे मन, मनगट, आणि मेंदू या 3M तत्त्वाचा वापर केला. यापूर्वी मी जे character केलं होतं तशीच मी प्रेक्षकांना वाटले. पणं माझा मुळ स्वभावानुसार मला खोटं वागता येत नाही, खोटं बोलता नाही. मी स्वतःचां स्वाभिमान खूप जपते. त्यामुळे मी जे बोलते तेच करते आणि तशीच वागते. आणि त्यामुळेच मी 100 दिवस टिकले आणि म्हणूनच बिग बॉसनी मला ''LADY OF WORDS" हा किताब दिला बिग बॉसच्या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव आले.चेहऱ्यावर हसू आणून खोटी स्तुती करणारे मिञ भेटले.आणि आयुष्यभर जिवापाड जीव लावणारे मिञ, मैत्रिणी सुध्दा भेटल्या हार जीत तर प्रत्येक ठिकाणी असतेच. भले मी ती ट्रॉफी जिंकली नाही. पण करोडो प्रेक्षकांची मने मात्र नक्कीच जिंकली..!'
अपूर्वानं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
संबंधित बातम्या:
Dholkichya Talavar : जाळ अन् धूर संगटच... कोकणची शान नेहा पाटील ठरली 'ढोलकीच्या तालावर'ची विजेती!