Anupama Serial Latest Episode Spoiler : टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत दररोज नव-नविन ट्विस्ट येत आहेत. मालिकेत एकीकडे समर आणि डिंबल यांची लगीनघाई सुरू आहे. तर दुसरीकडे अनुपमा आणि अनुजमधील दुरावा कमी होत चालला आहे. पण तरीही पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात अनुपमा आणि अनुज तयार नाहीत. त्यामुळे त्यांची लव्हस्टोरी अपूर्णच राहिली आहे. सध्या अनुपमा तिच्या लेकाच्या लग्नाची तयारी करताना दिसत आहे. 


'अनुपमा' मालिकेत लवकरच समर आणि डिंपलचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या आगामी भागात नववधू डिंपल स्वत:सोबत संवाद साधताना दिसणार आहे. ती म्हणत आहे,"आता येणाऱ्या अडचणींचा हसत सामना करायचा आहे". दरम्यान बरखा तिला नको ते सल्ले देणार आहे. 


काव्याच्या प्रेग्नंसीचं सत्य वनराजसमोर येणार


'अनुपमा' मालिकेच्या आगामी भागात काव्या वनराजला गुडन्यूज देताना दिसणार आहे. ती वनराजला सांगणार आहे,"आईपण काय असतं हे मला आता कळत आहे". त्यावर वनराज म्हणतो,"नेमकं प्रकरण काय?". त्यावर काव्या म्हणते,"मी आई होणार आहे आणि तू बाबा. माझ्या बाळाचा सांभाळ करण्यास मी सक्षम आहे". काव्याने दिलेली गुडन्यूज ऐकून वनराजचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला आहे. 






'अनुपमा' या मालिकेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळे ट्विस्ट आणण्यात येत आहेत. बरखा आणि अधिक व्यावसायाकडे लक्ष देणार आहेत. दरम्यान माया मात्र त्यांच्यामध्ये लुडबूड करताना दिसेल. तुम्ही अहमदाबादला राहायला जा, असं ती त्यांना सांगणार आहेत. अंकुशदेखील मायाला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे आता 'अनुपमा' मालिकेचा आगामी भाग खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. 


'अनुपमा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या लोकप्रिय मालिकेचा मराठीतही रिमेक करण्यात आला आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) असे या मालिकेचे नाव आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातही ही मालिका सुपरहिट आहे. 'अनुपमा' या मालिकेत रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) मुख्य भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Anupamaa Upcoming Twist: अनुपमा मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; काव्यानं गुडन्यूज दिल्यानंतर वनराज कशी देणार रिअॅक्शन?