Nava Gadi Nava Rajya : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता दातेचा (Anita Date) हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटो सोबत 'जो आवडतो सर्वांना' असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे, या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की, नेमका या फोटो मागचा अर्थ काय?. हा फोटो शेअर करण्यामागचं कारण आता प्रेक्षकांसमोर आलं आहे. नुकतंच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला. 'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.


अनिता दाते रमाच्या भूमिकेत 


'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत अनिता दातेचं पात्र या जगात नसल्याचे दाखवण्यात आले आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एन्ट्री घेत आहे. या मालिकेत अनिता दाते रमाची भूमिका सादर करणार असून, आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे. पल्लवी पाटील या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकरदेखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.  






'माझ्या नवऱ्याची बायको' या लोकप्रिय मालिकेनंतर दोन वर्षांनी प्रेक्षकांना त्यांची आवडती अभिनेत्री अनिता दातेला पुन्हा एकदा 'नवा गाडी नवं राज्य' या मालिकेतून एका नवीन भूमिकेत पाहायला मिळेल. 8 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे. 


आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अनिता म्हणाली, "माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील राधिका नंतर आता रमा या नवीन भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय याचा मला अतिशय आनंद आहे. रमा हे पात्र मालिकेत हयात नाही आहे पण तरीदेखील या पात्रामुळे मालिकेला एक रंजक वळण येणार आहे. त्यामुळे ही रमा साकारताना मला खूप मजा येतेय. प्रेक्षकांना राधिका सारखीच रमा देखील खूप आवडेल अशी मला खात्री आहे."


नवा गाडी नवं राज्य
कुठे पाहायला मिळेल? झी मराठी
कधी? 8 ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता


संबंधित बातम्या


Nava Gadi Nava Rajya : दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी 'नवा गडी नवं राज्य'; 8 ऑगस्टपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला


Rang Majha Vegla : कार्तिकीला कळणार दीपिका आपली बहिण असल्याचं सत्य! दीपा-कार्तिकमध्ये सुरु होणार नवा संघर्ष