Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi new season) घरातील एका सदस्याला जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळत आहे. त्याच्या खेळाचे, घरातील वागणुकीचं साऱ्यांनाच फार कौतुक वाटतंय. या सगळ्याचं भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंकडूनही त्याचं भरभरुन कौतुक केलं जातंय. त्यातच आता त्याच्या 'झापूक झूपुक'वर खिलाडी कुमारने म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) ठेका धरला. त्यामुळे आता सूरज महाराष्ट्रातच नाही तर देशात फेमस झाला असल्याचंही पाहायला मिळतंय.  


कलर्स मराठीकडून अक्षय कुमारच्या झापूक झुपूक डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत सूरजचं कौतुक केलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर 'खेल खेल में' या चित्रपटाची टीम कल्ला करणार आहे. त्यांच्या कल्ल्याने रविवारचा 'भाऊचा धक्का' एकदम झापुक झुपुक होणार आहे.


अक्षय कुमारचा 'झापूक झुपूक' डान्स


'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये भाऊच्या धक्क्यावरुन अक्षय कुमार वर्षाला म्हणतोय,"वर्षा किती वर्षांनी दिसतेस". त्यानंतर डीपीला विचारतो,"घरात मटन मिळतंय की नाही". त्यानंतर सूरजच्या स्टाईलने भाऊच्या धक्क्यावर रितेश आणि खिलाडी कुमार झापुक झुपुक थिरकताना दिसतात. एकंदरीतच आजचा भाऊचा धक्का एकदम 'खेल खेल में' स्टाईलने होणार आहे. 






सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स


अक्षय आणि सूरजच्या या झापूक झुपकू डान्सवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, गुलीगतनं अक्षय कुमारला पण नाचवलं...कसं झापुक झुपूक झापूक झुपूक. दुसऱ्या युजरने म्हटलं की, सूरज चव्हाण रिस्पेक्ट बटन. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, सुरज चव्हाण तू इमेज बिल्डर आहेस भावा. तुला काही कळो न कळो...आम्हाला तुझ्यातला माणूस कळला... महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली, चांगली वाटणारी माणसं तिथे जाऊन माती खात आहेत आणि तू तिथला धुळीचा कण न कण स्वच्छ करून वातावरण सकारात्मक ठेवत आहेस...कोणी माज दाखवून दादा झालं तर कोणी इमेज किलर होऊन स्वतःच्याच प्रतिमेची पतंग करून उडवत बसलं...पण तू तुझी इमेज बिल्ड केलीस...


ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi : 'मौंजुलिका'! भाऊच्या धक्क्यावर जान्हवीच्या बाबतीत अंकिताचा मोठा खुलासा, रितेश भाऊलाही बसला धक्का