Ajinkya Nanaware Shivani Surve Wedding Update : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या रोमँटिक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या अद्वैत आणि नेत्राची लगीनघाई पाहायला मिळत आहे. आता खऱ्या आयुष्यातही अद्वैत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 


'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अद्वैत आणि नेत्राच्या लग्नासोहळ्याची तयारी सुरू आहे. मालिकेत अद्वैतच्या भूमिकेत अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) आणि नेत्राच्या भूमिकेत तितिक्षा तावडे आहे. पण आता अद्वैतच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 






अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो 'बिग बॉस' (Bigg Boss)  फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेला (Shivani Surve) डेट करत आहे. शिवानी सुर्वे ही बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची स्पर्धक आहे. या बहुचर्चित कार्यक्रमातच तिने अजिंक्यसोबतच्या तिच्या नात्याची कबुली दिली होती आणि तिचं नातं जगजाहीर केलं होतं. 


लग्नाबद्दल अजिंक्य म्हणाला...


शिवानी आणि अजिंक्यने कपल टॅटूदेखील काढला आहे. आता 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू असतानाच अजिंक्यने त्याच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबाबत भाष्य केलं आहे. नुकतचं अल्ट्रा मराठी बजला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य म्हणाला,"हो.. मी आणि शिवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहोत. पण थोडा वेळ लागेल". अजिंक्य आणि शिवानी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. 


शिवानी सुर्वे कोण आहे? (Who Is Shivani Surve)


शिवानी सुर्वे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. देवयानी, सुंदर माझं घर, नव्या, अनामिका, तू जिवाला गुंतवावे, एक दिवाना था आणि लाल इश्क अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'देवयानी' या मालिकेच्या माध्यमातून शिवानी सुर्वे घराघरांत पोहोचली आहे. 'ट्रिपल सीट' या सिनेमातदेखील शिवानीने काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका रोमँटिक वळणावर; अद्वैत आणि नेत्राच्या प्रिवेडिंग फोटोशूटचे फोटो व्हायरल