Marathi Serial Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) सध्या रंगतदार वळणावर आहे. नेत्रा आणि विरोचकमध्ये वार-पलटवार सुरू आहे.सस्पेन्स, थ्रिलर असलेल्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने  प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. आता,  मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी यावर भाष्य केले आहे. 


झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला नुकतेच 500 भाग पूर्ण झाले. या मालिकेत सध्या वरचढ ठरत असलेल्या विरोचकाला त्रिनयना देवीच्या लेकी छोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे. आस्तिका कोण आणि नेत्रा कोण याचा उलगडा घरातील सदस्यांना झाला आहे. त्यामुळे आता विरोचक आणि त्रिनयना देवीची मुलगी असलेल्या नेत्रामध्ये युद्ध कधी होईल याची प्रेक्षकांनी उत्सुकता लागली आहे. 


मालिकेचा शेवट कधी होणार?


‘इट्स मज्जा’या वेब पोर्टलसोबत बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतील आपल्या रुपाली म्हात्रे या व्यक्तिरेखेबाबत बोलताना सांगितले की, मालिकेतील सुरुवातीचे काही भाग छान होते. त्या व्यक्तीरेखेतील खलनायकी छटा बाहेर आली नव्हती. हळूहळू ही छटा बाहेर येऊ लागली.रुपालीच्या भूमिकेने खूप काही दिले. एखाद्या चौकटीबाहेरची भूमिका मिळणे हे आव्हानात्मक असते. रुपालीची भूमिका ही अशीच होती असेही ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले.


'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये विरोचक आणि त्रिनयना देवीच्या मुलींमध्ये युद्ध होईल. या युद्धात विरोचकाचा शेवट झाल्यानंतर मालिकेचा शेवट होईल असेही त्यांनी सांगितले. विरोचक संपल्यानंतर मालिकेला काही अर्थच राहणार नाही, त्यामुळे मालिका संपू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला. 






मालिकेत सध्या रंगतदार वळण आले आहे. खरी नेत्रा कोण आहे, याचा उलगडा घरातील लोकांना झाला आहे. त्यामुळे आस्तिकाला उघडे पाडण्यासाठी नेत्रा आणि इतर सदस्य डावपेच लढवत आहे. येत्या काही एपिसोडमध्ये आस्तिकाचा वध नेत्राकडून होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 


इतर संबंधित बातम्या: