नाशिक: नाट्यगृहाची बकाल अवस्था, प्रशांत दामलेंचा प्रशासनाला सवाल
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 10:39 PM (IST)
नाशिक: नाशिकचं सांस्कृतिक मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरावस्थेवरुन फेसबूकवर कलगीतुरा रंगला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची छायाचित्रं फेसबुकवर टाकली आहेत. अशा नाट्यगृहात कसे प्रयोग करणार? कसे रसिक येणार? आणि कसं रंगणार नाटक? असे प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे दामले यांनी काढले आहेत. दरम्यान प्रशांत दामलेंच्या या फेसबूक पोस्टला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबूकवरुन उत्तर दिलं आहे. राज्यातील इतरही नाट्यगृहांची अशीच दुरावस्था आहे. मात्र आमच्यावरचं टीका का केली जाते? असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला आहे.